वॉकेथॉनमध्ये धावले ६५० जण, इंडिया बुकमध्येही झाली नोंद:जागतिक हृदयरोग दिनानिमित्त क्रीडा संकुलात आयोजन
जागतिक हृदयरोग दिनानिमित्त रविवारी (२९ सप्टेंबर) कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे २ व ३ किमी वॅाकेथॅानचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक हार्ट फेडरेशनच्या ‘यूज हार्ट फॉर ॲक्शन’ या घोषवाक्याखाली वॉकेथॉनचे आयोजन केले होते. विभागीय क्रीडा संकुलात हे वॉकेथॉन पार पडले. यामध्ये ६५० जण धावले. कार्यक्रमात सहभागी झाल्याने या कार्यक्रमाची नोंद इंडिया बुक ॲाफ रेकॅार्ड्््समध्ये झाली. सुरुवातीस सामूहिक झुंबा डान्सही पार पडला. कमलनयन बजाज रुग्णालयातील हृदयरोग व अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित भागवत म्हणाले, हृदयाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. छोट्या गोष्टी पाळून हृदय आरोग्यदायी ठेवणे शक्य आहे. डॉ. मिलिंद वैष्णव म्हणाले, नियमित व्यायाम प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे. डॉ. अजय रोटे यांनी रेकॉर्ड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सीपीआर प्रणालीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सचिन मुखेडकर, डॉ. रणजित पालकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.