जस जसे तुमचे वय वाढू लागते त्यानंतर वयाच्या काही काळाने त्वचा निस्तेज दिसू लागते. त्याच प्रमाणे बारीक रेषा, डोळ्याभोवती सुरकुत्या दिसायची सुरुवात होते. तर काहीना ताणतणावमुळे चेहऱ्यावर डाग आणि अकाली वृद्धत्व येते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अति ताणतणाव, धकाधकीचे जीवन, योग्य खाणेपिणे नसणे यासारख्या गोष्टी असू शकतात. पण धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे, त्वचेचे हे नुकसान कमी केले जाऊ शकते आणि चेहऱ्याला पुन्हा तरुण आणि चमकणारा देखावा दिला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या जेवणात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल, ज्याबद्दल न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी मुख्या ८ भाज्यांचा समावेश आहारात करण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​गाजर

गाजरांमध्ये बीटा कॅरोटीन असतात, यामुळे त्वचा तरुण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे तरी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होतो त्याच प्रमाणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे रोगांशी लढण्यास मदत होते. या भाजीचा रस रोज एक ग्लास प्यायल्याने दृष्टी सुधारते आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यामुळे तुमच्या आहारात गाजराचा समावेश करा.

​द्राक्ष

थंडीच्या दिवसात द्राक्षांचा वापर केला जातो या फळामध्ये रेसवेराट्रोल आणि व्हिटॅमिन-सी असते. अँटी-एजिंग गुणधर्मांनी समृद्ध द्राक्षे त्वचेच्या पेशींचे विघटन रोखतात. अशात जांभळ्या द्राक्षाचा रस रोज प्यायल्यास रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचा धोकाही कमी होतो. त्यामुळे त्वचा सुंदर होण्यासाठी द्राक्षांचा वापर करा.

​लिंबूवर्गीय फळे

लिंबूवर्गीय फळे संत्र्यामध्ये केवळ व्हिटॅमिन सीच नाही तर अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. हे घटक त्वचेसाठी तर चांगलेच असतात, पण कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही ते उपयुक्त ठरतात. त्यामुळे दिवसभरातून एकदा लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा.

कांदा

काही लोक जेवणामध्ये कांदाचा समावेश करतात. कांदामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. हे धमनी गोठण्यापासून संरक्षण करते. यासोबतच कांदा शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतो. त्यामुळे तुमच्या जेवण्यामध्ये कांद्याचा समावेश करा.

​पालेभाजी

पालेभाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात यामुळे अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. यासाठी भाज्या कच्चा किंवा हलक्या शिजवून घ्या. डॉ मुखर्जी यांच्या मते, कोबी खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हलके तळून किंवा वाफवून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यातील पोषक तत्व शरीरात चांगले शोषले जातात.

​पालक

पालकामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे सुरकुत्या तयार होण्यास प्रतिबंध करते. या हिरव्या पालेभाज्यामुळे मोतीबिंदूपासूनही संरक्षण मिळते. पालकमध्ये व्हिटॅमिन-के खूप जास्त असते, जे रक्तवाहिन्या मजबूत करते आणि शरीराला फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

​टोमॅटो

टोमॅटो हे अँटिऑक्सिडंट्स आणि लाइकोपीनच्या प्रमुख स्त्रोतांपैकी एक आहे. हे अन्ननलिका, पोट आणि कोलन कर्करोगापासून शरीराचे संरक्षण करते. टोमॅटो शिजवून किंवा कॅनमध्ये पॅक केल्यावरही त्यातील लाइकोपीन नष्ट होत नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *