[ad_1]

लिमा: एलियन्सबाबत दरदिवशी वेगवेगळे दावे केले जात आहेत. कोणी एलियन्स पाहिल्याचं सांगतं तर कोणी सांगतं की एलियन्सने त्यांचं अपहरण केलं होतं. पण, नुकतीच एक धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. यामुळे सारेच हैराण झाले आहेत. आदिवासी समुहाच्या एका गटाला त्यांच्यावर एलियन्सकडून हल्ला होण्याची भीती आहे. ते त्यांचा जीव वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, या आदिवासी लोकांच्या मते त्यांनी एलियन्सला पाहिलं आहे. या भयानक दिसणार्‍या एलियन्सच्या डोळ्यांचा रंग पिवळा आहे. त्यांची लांबी ७ फूट आहे. हे प्रकरण पेरूच्या ईशान्येला असलेल्या अल्टो नाने जिल्ह्यात राहणाऱ्या इकिटू जमातीशी संबंधित आहे. त्यांनी एलियन्सचे नाव लॉस पेलाकरस (फेस पीलर्स) ठेवले आहे. काही काळ गडद रंगाचे हुडी घातलेले एलियन्स त्यांच्यावर हल्ले करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चेहरा खातील असं ते म्हणतात.

एकाच देशात दिसले १००० यूएफओ, शास्त्रज्ञांनी सांगितलं कुठे लपले आहेत एलियन्स, पहा…
एलियन्स पहिल्यांदा कधी दिसले?

सुमारे एक महिन्यापूर्वी, ११ जुलै रोजी एलियन्स पहिल्यांदा दिसल्याचा दावा केला आहे. तेव्हापासून एक १५ वर्षांची मुलगी रुग्णालयात दाखल आहे. तिने एलियन्सला पाहिले होते, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप याबाबत काही अधिकृत माहिती नाही की ते एलियन्स आहेत. त्याचवेळी या समाजाचे नेते जाइरो रेतेगुई डेव्हिला म्हणाले, ‘संघर्षादरम्यान त्यांनी त्या मुलीच्या मानेचा काही भाग कापून टाकला होता.’

उत्खननात मुलीला सापडला १५०० वर्ष जुना जादूचा आरसा, पाहा कसा दिसायचा, वापर ऐकून चक्रावाल
आता लोकांना कथित एलियन्सपासून वाचवण्यासाठी रात्रीची गस्त केली जात आहे. महिला, लहान मुलं आणि वृद्ध यांच्याबाबत अधिक काळजी घेतली जात आहे. भीतीमुळे गावकऱ्यांची रात्रीची झोप उडाली आहे, असं स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. कम्युनिटी लीडर डेव्हिला यांनी सांगितले की ते ‘फेस पीलर्स’ समोर आले होते. त्यांनी सांगितले की त्यांच्या शूज गोलाकार आकाराचे आहेत, जे ते हवेत उडण्यासाठी वापरतात. त्यांचे डोके मोठ्या आकाराचे असतात आहे, ते मास्क घालतात, त्यांचे डोळ्यांचा रंग पिवळा आहे. पळून जाण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

ते म्हणाले, ‘आम्ही जवळपास त्यांना समोरासमोर पाहिले आहे. त्यांचा चेहरा क्वचितच दिसत होता. मी त्याचे संपूर्ण शरीर एक मीटर उंचीवर उडताना पाहिले आहे. त्यांनी या प्राण्यांना गोळ्याही घातल्या. पण, गोळी लागल्यावरही ते उठले आणि गायब होऊन गेले, असंही या आदिवासी लोकांनी सांगितलं आहे. त्यामुळे सध्या या परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

[ad_2]Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *