मुंबई : देशातील बजेट एअरलाइन स्पाइसजेटने त्यांच्या ८० वैमानिकांना तीन महिन्यांच्या पगाराशिवाय सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचललेले हे पाऊल असे कंपनीने म्हटले आहे. मात्र अचानक झालेल्या या घोषणेमुळे विमान कंपनीतील आर्थिक संकट आणखी गडद होण्याची चिन्हे म्हणूनही पाहिले जात आहे. स्पाइसजेटने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या ८० वैमानिकांना विनावेतन रजेवर पाठवण्याचा निर्णय तात्पुरता आहे आणि खर्च तर्कसंगत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. एअरलाइनचे पायलट ज्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे ते बोइंग आणि बॉम्बार्डियर विमाने उडवतात.

‘आयटी’ क्षेत्रात मंदीचे संकट; भारतीय टेक कंपनीने जगभरात केली कर्मचाऱ्यांची मोठी कपात
कामावरून काढले नाही : स्पाइसजेट
स्पाइसजेटने आपल्या निर्णयाचे समर्थन करत कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढू नये या धोरणानुसार हे पाऊल उचलल्याचे सांगितले. कंपनीने सांगितले की, कोविड महामारीच्या सर्वात वाईट दिवसांमध्येही त्यांनी या धोरणाचे पालन केले होते. या हालचालीमुळे वैमानिकांची संख्या आणि विमानांची संख्या यांच्यात चांगला समन्वय साधला जाईल, असा एअरलाइनचा दावा आहे.

जागतिक मंदीचे संकट; जागतिक बँकेचा इशारा, मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक दरवाढीचा परिणाम
वैमानिकांना ३ महिन्यांनंतर ड्युटीवर बोलावणार का?
कंपनी आपल्या निर्णयाला तात्पुरता असल्याचा दावा करीत आहे. परंतु या निर्णयामुळे वैमानिकांमध्ये प्रचंड घबराट आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एअरलाइनच्या अनेक पायलटांनी या निर्णयावर चिंता व्यक्त करताना सांगितले की, कंपनी आर्थिक अडचणीत असल्याची त्यांना आधीच माहिती होती, परंतु अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना धक्का बसला आहे. सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर तीन महिन्यांनी त्यांना पुन्हा ड्युटीवर बोलावले जाईल की नाही याची खात्री नाही.

ऐकावं ते नवलंच… राजीनामा दिल्यावर पगार १०% वाढतो, जाणून घ्या ‘या’ कंपनीची आगळीवेगळी पॉलिसी
पगार वगळता इतर फायदे मिळत राहतील: स्पाइसजेट
कंपनीने आश्वासन दिले आहे की, विनावेतन रजेवर पाठवलेले असतानाही, त्यांचे वैमानिक विमा आणि रजा-प्रवासासारख्या इतर कर्मचार्‍यांचे फायदे उपभोगत राहतील. कंपनीने असा दावाही केला आहे की ८० वैमानिकांना रजेवर पाठवले असले तरी त्यांच्याकडे सर्व उड्डाणे चालवण्यासाठी पुरेसे वैमानिक उपलब्ध असतील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.