90 तास काम:राजीव बजाज म्हणाले, याची सुरुवात आधी वरिष्ठांपासून करावी
लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) के चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम यांच्या आठवड्याला ९० तास काम करण्याच्या वक्तव्यानंतर बजाज ऑटोचे मालक राजीव बजाज म्हणाले की, ही व्यवस्था सर्वात आधी वरच्या स्तरावर लागू करायला हवी. ते पुढे म्हणाले की, भारतीय कंपन्यांनी कामाचे तास मोजण्याचे जुने विचार सोडायला हवेत. कंपन्यांना कळायला हवे की कामाचा दर्जा महत्त्वाचा आहे, कामाचे तास नव्हेत. कामाचे तास कंपनीला चांगले करण्यापासून रोखत असतील तर कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटविषयी प्रश्न उपस्थित होतो. कंपनीच्या लीडरशिपमध्ये असताना माझे काम आपल्या कर्मचाऱ्यांना कामासाठी पोषक वातावरण देणे आहे. लीडर्सनी रणनीतीवर पुनर्विचार केला पाहिजे. याबाबत एक उदाहरण देताना बजाज यांनी सांगितले की, त्यांच्या एका सहकारी कर्मचाऱ्याने कंपनीच्या रचनेबाबत खूप टीका केली. त्यावर बजाज म्हणाले, समस्या अशी आहे की, फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या लोकांना कंपनीच्या यंत्रणेतील समस्यांबाबत माहिती असते. परंतु त्यांच्याकडे अधिकार नसतात. याउलट टॉप मॅनेजमेंटकडे अधिकार असतात. परंतु त्यांना खाली काय सुरू आहे, याची माहिती नसते. यासाठी अशा टीका समजून घेण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांपेक्षा ५३४ पट जास्त आहे सुब्रमण्यम यांचे वेतन सुब्रमण्यम ऑक्टोबर २०२३ मध्ये एलअँडटीचे चेअरमन बनले होते. कंपनीच्या वार्षिक बोर्डाच्या अहवालानुसार २०२३-२४ मध्ये त्यांना ५१ कोटी रुपये वेतन-भत्त्याच्या रूपात मिळाले. ही रक्कम एलअँडटीच्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी वेतनापेक्षा ५३४ पट अधिक आहे. शिवाय त्यांच्या वेतनात ४३.११ टक्के वाढ झाली आहे.