आज काका-पुतणे येणार एकाच मंचावर:दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान, म्हणाल्या- लोकशाही पद्धतीने निर्णय होईल

आज काका-पुतणे येणार एकाच मंचावर:दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान, म्हणाल्या- लोकशाही पद्धतीने निर्णय होईल

महाराष्ट्रात सध्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे पवार काका-पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. या सगळ्यावर खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केले आहे. जे कार्यकर्त्यांच्या मनात तेच होईल- सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, हा माझा एकट्याचा निर्णय नाही, हा पक्षाचा निर्णय असणार आहे. पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्हाला सहा दशकांपासून म्हणजे तुमच्या जन्माच्या आधीपासून माहीत आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच करतात. त्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेईल. सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या या उत्तराने आता जो काही निर्णय असेल तो कदाचित उद्या म्हणजे 10 जून रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ देखील उपस्थित असणार आहेत. राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका, साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय’वर चर्चा सत्र होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन 10 जूनला सकाळी 10.10 वाजता शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन येथे होणार आहे. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन देखील उद्या पुण्यात पार पडणार आहे. या दोघांच्याही कार्यक्रमात आगामी स्थानी स्वराज्य संस्थानच्या अनुषंगाने असणार असल्याचे बोलले जाते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment