[ad_1]

जळगाव: एरंडोल शहरातील हिमालय पेट्रोलपंपमागील परिसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी खेळत असताना ९ वर्षीय बालकाचा छातीत आसारी घुसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळी घडली. विशाल रविंद्र गायकवाड (वय ९, रा. हिमालय पेट्रोल पंपामागे, एरंडोल) असे मयत बालकाचे नाव आहे. ठेकेदार आणि नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यात नकार दर्शविला होता. या आक्रमक पावत्र्यिानंतर एरंडोल पोलिस ठाण्यात नगरपालिकेचे अभियंता आणि ठेकेदार या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल शहरात जुना धरणगाव रस्ता भागात भिलाटी परिसरात विशाल रविंद्र गायकवाड हा आई-वडील, लहान भाऊ-बहीण यांच्यासह राहत होता. हातमजुरी करून त्याचा परिवार उदरनिर्वाह करतात. दरम्यान, एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु आहे. तेथे काही आसाऱ्या उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवलेल्या होत्या. सोमवारी विशाल त्याच्या मित्रांसह तेथे खेळत असताना अचानक तो पडला आणि याठिकाणी ढाप्यावरील एक लोखंडी आसारी त्याच्या छातीत घुसली. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत त्याला खाजगी रुग्णालयात उपचाराला नेले. मात्र, रुग्णालयात पोहचेपर्यंत विशालचा मृत्यू झाला होता, याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.

४०० वर्षांपूर्वी जहाज बुडाले, अमाप सोने-चांदी, रत्नांचा साठा, मेटल डिटेक्टर घेऊन पाणबुडे समुद्रात
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. ही घटना ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे झाली आहे. दोषींवर नगरपालिकेने कारवाई केली पाहिजे अशी मागणी कुटुंबियांच्या वतीने समस्त भिल्ल समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली, तसेच याबाबत पोलिस निरिक्षकांना निवेदन देण्यात आले. जोपर्यंत संबंधित दोषींवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पावित्राही घेण्यात आला होता. त्यानुसार मयत विशाल याचे वडील रवींद्र भिल यांच्या फिर्याद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

नगरपालिकेच्या कामाच्या ठिकाणी अर्धवट कामामुळे बाहेर पडलेल्या गजावर डाव्या बाजूने विशाल पडल्याने आसारी छातीत घुसली आणि त्याचा मृत्यू झाला. गटारीचे निष्काळजीपणाने काम करुन ते अर्धवट लोखंडी गजावर पडल्यामुळे त्यांच्या मुलाच्या मृत्यू ठेकेदार आणि कामावर देखरेख ठेवणारे अभियंता हे जबाबदार आहेत, असे फिर्यादीत म्हटले असून त्यानुसार नगरपालिकेचे अभियंता आणि ठेकेदार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सतीष गोराडे हे करीत आहेत.

स्क्रीन शेअर करणे पोलिसाला साडेचार लाखांना पडलं, डेबिट कार्ड सुरु करण्याच्या बहाण्याने गंडा
Read Latest Maharashtra News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *