शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा:पिक विमा कंपन्यांना 72 तासांत माहितीसाठी ऑफलाईन सुविधा देण्याच्या सूचना-मुंडे
मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. तसेच 72 तासाच्या आत पिक विमा कंपन्यांना माहिती देण्यासाठी ऑफलाईन सुविधा देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, 72 तासांत पंचनामे नाही, तर केवळ माहिती देणे हे कायद्याने बंधनकारक आहे. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीला अनुसरून अतिवृष्टीमुळे आज वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तसेच ठिकठिकाणी नेटवर्क चालत नाही. त्यामुळे मोबाईल वरून देखील माहिती देता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कालच संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांना तसेच हिंगोली, परभणी, नांदेड यांच्यासह सर्व जिल्हाधिकऱ्यांना तात्काळ कंपन्यांना आदेश काढून ऑफलाईन सुद्धा माहिती देण्याची सुविधा देण्याची सूचना केली आहे. कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक आणि मंडळ अधिकाऱ्यांना देखील तातडीने ऑफलाइन 72 तासाच्या आत माहिती घेण्याचे आदेश दिले असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. परळी वैद्यनाथ मध्येही आरोग्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना परळी वैद्यनाथ शहरातील सरस्वती नदीला मागील दोन-तीन दिवसात आलेल्या पुरामुळे ठिकठिकाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. याठिकाणी आज भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नागरिकांना तातडीची मदत, धान्य आदी बाबींची तात्काळ व्यवस्था करण्यासह झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. स्वच्छता अभियान व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनास केल्या असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे. या संदर्भातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… शेतकरी पण लाडका आहे, हे सरकारने दाखवून द्यावे:राज ठाकरे यांचे आवाहन, गणपतीच्या काळातच नुकसान भरवाईची देण्याची मागणी मराठवाड्यामध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेत पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आहे. मात्र, ही मागणी करतानाच त्यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली आहे. शेतकरी देखील सरकारचा लाडका आहे, हे सरकारने दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पूर्ण बातमी वाचा…