दिशाभूल केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल:संभाजीनगर मधील युवकाची शासनाची बदनामी केल्याची तक्रार
शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मयत शेतकऱ्यांचे वारस, नातेवाईक, शेतकरी, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या गोरगरीब महिला, यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून नैराश येईल आणि त्यांनी शासनाविरोध उठाव करावा, तसेच शासनाविरोधात खोटे आंदोलन उभे राहावे, यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या पोस्टवरून त्यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी काळात सण उत्सव येत असून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी या उद्देशाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाचा निधी बंद, असे परिपत्रक महसूल वन विभागाने काढलेले नसताना देखील चुकीची माहिती देऊन शासनाची जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या विजय भाऊसाहेब काळुंखे या 27 वर्षीय युवकांने हा गुन्हा दाखल केला आहे. वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली पोस्ट देखील पहा आपल्या पोस्टमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासनाचे एक परिपत्रक पोस्ट केले आहे. तसेच त्यामध्ये शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे लाडकी बहीण योजनेला दिला असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये आव्हाड यांनी लिहिले की, ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद. महसूल व वन विभागाने काढले परिपत्रक
‘लाडकी बहीण’ चा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना?. शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे ‘लाडकी बहीण’ योजनेला.’ भाजपनेही केली होती टीका आव्हाड यांच्या पोस्टवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही टीका केली होती. त्यांनी आव्हाड यांच्या पोस्टला रिपोस्ट करत लिहिले होते की, ‘लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. या योजनेला जमेल तितके बदनाम करण्याचे काम सुरू आहे. खोट्यानाट्या कंड्या पिकवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येतो आहे. जितेंद्र आव्हाड यांना शासकीय कार्यपद्धती कळू नये, आणि साधा GR चा अर्थ समजू नये, हे कळण्या पलिकडचे आहे. वित्त विभागाने फक्त खर्चाचा हेड बदलला आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना यापुढेही मदत मिळणे सुरूच राहणार आहे. माहिती न घेता अफवा पसरवून आव्हाड शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेत. या फेक न्युज प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे.’ राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. लोअर परळ परिसरातील कमला मिल टाईम्स टॉवरला भीषण आग:अनधिकृत बांधकामांमुळे अशा घटना घडत असल्याचा मनसेचा आरोप उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल टाईम्स टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. सकाळी साडेसहा वाजता टाईम्स टॉवरला आग लागल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्ण बातमी वाचा…