जयपूर: विद्युत प्रवाहापासून एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अख्खं कुटुंब संपल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील सालुंबर जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पहिले कुटुंबप्रमुखाला विजेचा धक्का बसला, त्यामुळे त्याची पत्नी त्याला वाचवण्यासाठी पुढे आली, पण तिलाही विजेचा धक्का बसला. यानंतर दोन्ही मुलांनी आई-वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला आणि चौघांचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुःखद घटना सालुंबर जिल्ह्यातील ढिकिया गावातील कुन भागात घडली. येथे ६८ वर्षीय उन्कार मीना यांच्या घरासमोर लोखंडी गेट बसवण्यात आले. गुरुवारी या लोखंडी गेटमधून अचानक विद्युत प्रवाह आला. गेटमधून विद्युत प्रवाह वाहत असताना उन्कारला विजेचा धक्का बसला. उन्कारचा आवाज ऐकून त्यांची पत्नी भंवरी मीना (६५) मदतीसाठी धावली, मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला.

आई-वडिलांना विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्यांचा मुलगा देवीलाल (वय २५) तसेच मुलगी मंगी (वय २२) या दोघांना वाचवण्यासाठी पुढे आले. उन्कार आणि भंवरी यांच्या दोन्ही मुलांनाही विजेचा धक्का बसला आणि चौघांचाही तिथेच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन दाखल झाले आणि त्यांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शवागारात पाठवले आहे. त्यानंतर ते नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात येईल. याप्रकरणाचा तपास सध्या सुरु असल्याचं पोलिस सांगत आहेत.
दिवाळी तोंडावर अशा पद्धतीने संपूर्ण कुटुंब संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने नातेवाइकांमध्ये आणि परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News