नवी दिल्ली: Aadhar Card Updates: भारतीयांसाठी Aadhar Card खूप महत्वाचे आहे. विविध कामासाठी आवश्यक असेलेले हे कार्ड आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. ज्याचा उपयोग सरकारी योजनांपासून ते शाळा, महाविद्यालये इत्यादी सर्वत्र प्रवेशासाठी केला जातो. मालमत्ता खरेदी करण्यापासून ते प्रवासादरम्यान ओळखपत्रासाठी, बँक खाते उघडण्यापर्यंत, आयटीआर भरण्यापर्यंत सर्वत्र याचा वापर केला जातो. आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेचे कारण म्हणजे त्यात सर्व नागरिकांची Biometric माहिती नोंदवली जाते. जी इतर कोणत्याही ओळखपत्रात नोंदवली जात नाही. Aadhar Card च्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते अपडेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे.

वाचा: Samsung Offers: सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनवर आतापर्यंतचा बेस्ट डिस्काउंट, २२,८४९ रुपयांत घरी येईल ७४,९९९ रुपयांचा फोन

कधी- कधी आधार बनवताना आपली काही माहिती चुकीची टाकली जाते. अशा परिस्थितीत आधार जारी करणारी संस्था UIDAI ने नागरिकांना आधार अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. Aadhar Card मधील कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यम वापरू शकता. परंतु, आधारमध्ये टाकलेली माहिती आपण किती वेळा बदलू शकतो याची अनेकांना माहिती नसते. याबद्दल जाणून घ्या सविस्तर.

UIDAI ने ट्विट करून माहिती दिली:

UIDAI ने आधारमध्ये किती वेळा Details बदलता येते याची माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबद्दल ट्विट करून UIDAI ने सांगितले आहे की डेमोग्राफिक माहिती बदलली जाऊ शकते. नावात काही चूक असल्यास, तुम्ही ते दोनदा बदलू शकता. त्याच वेळी, जन्मतारीख एकदा बदलली जाऊ शकते. त्याच वेळी, आपण पत्त्यामध्ये आपल्याला पाहिजे तितक्या वेळा बदल करू शकता. तुम्ही फक्त एकदाच लिंग बदलू शकता. त्याच वेळी, आपण आपल्या गरजेनुसार नोंदणीकृत मोबाइल नंबरमध्ये बदल करू शकता. तुम्हाला प्रत्येक बदलासाठी ५० रुपये शुल्क द्यावे लागेल.

आधारमध्ये काही तपशील बदलण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असेल: पासपोर्ट, बँक पासबुक,पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, चालक परवाना, वीज बिल.

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

वाचा: Smart Tv Offers: मस्तच ! ५० % पर्यंत डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ सुपरहिट स्मार्ट टीव्ही, लिस्टमध्ये One Plus-Redmi चाही समावेश

वाचा: WhatsApp Features: एकच नंबर ! आता ३२ जण करू शकणार WhatsApp ग्रुप कॉलिंग, येतंय नवीन फीचरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.