अशीच एक स्टार किड जी सुपरस्टारच्या कुटुंबात जन्माला आली, वडिलांप्रमाणे ती अभिनय क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकली नाही. अभिनेत्रीने काही सिनेमे करुन नंतर बॉलिवूड इंडस्ट्री सोडली.
ही अभिनेत्री आहे राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची लेक रिंकी खन्ना. रिंकी खन्नाने केवळ पाच वर्ष करिअर केलं. या करिअरमध्ये तिने ९ सिनेमे केले. पण तिचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला नाही.
रिंकी खन्नाचे आई-वडील दोघंही इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहेत. राजेश खन्ना यांनी इंडस्ट्रीत मोठं स्टारडम मिळवलं. तर डिंपल कपाडिया यांनीही बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं. डिंपल कपाडिया आजही इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह असून त्या सिनेमात भूमिका साकारताना दिसतात. सुपरस्टारच्या कुटुंबातून आलेल्या रिंकी खन्नाला मात्र हे स्टारडम मिळवता आलं नाही.
२००४ नंतर बॉलिवूडला रामराम
रिंकी खन्नाने १९९९ मध्ये प्यार में कभी कभी सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. रिंकीला या सिनेमासाठी बेस्ट फीमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. पण हा सिनेमा फ्लॉप ठरला. दुसऱ्या सिनेमात ती सपोर्टिंग रोलमध्ये होती. तर तिसऱ्या सिनेमात करीना कपूर आणि तुषार कपूरसोबत तिने स्क्रिन शेअर केली होती. तिने पाच वर्षांच्या करिअरमध्ये ९ सिनेमे केले. रिंकी खन्नाने २००४ नंतर सिनेमात काम केलं नाही. तिने व्यावसायिक समीर सरनसह लग्न केलं, त्यानंतर आता लंडनमध्ये ती स्थायिक आहे.