नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राची ३३ लाखांची फसवणूक झाल्याचे आता समोर आले आहे. आकाशने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण आकाशची एवढ्या मोठ्या रक्कमेची फसवणूक झाली तरी कशी, हे आत समोर आले आहे.
आकाशची कशी झाली फसवणूक जाणून घ्या…
आकाश हा सध्या समालोचन करत आहे. त्याचबरोबर आकाश हा अजून काही व्यवसायांमध्ये असल्याचे आता समोर येत आहे. क्रिकेटमध्ये खेळताना सर्वांनाच स्पोर्ट्स शूज लागतात. ही सर्वात बेसिक गोष्ट आहे. त्यामुळे आकाश चौप्रानेही असाच विचार केला आणि त्याने एका स्पोर्ट्स कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. कमलेश पारीख आणि त्यांचा मुलगा ध्रुव पारीख हे स्पोर्ट्स शूज बनवणारी कंपनी चालवत आहेत. या कंपनीमध्ये आकाशने गुंतवणूक केली होती. आकाशने या व्यवसायात जवळपास ५८ लाख रुपये गुंतवले होते. या व्यवसायामधून आपल्याला २५ लाख रुपये परत मिळाले आहेत. पण कमेलेश पारीख आणि त्यांचा मुलगा ध्रुुव पारीख यांनी जवळपास ३३ लाख रुपये अजूनही आपल्याला परत केले नाहीत, असा दावा आकाशने केला आहे. याबाबत आकाशने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय जाणून घ्या…
आकाशने ध्रुव पारीखला त्याच्या स्पोर्ट्स शूजच्या कंपनीसाठी ५८ लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठी दिले होता. या दोघांमध्ये लिखीत करारही झाला आहे. या करारानुसार आकाशने जे पैसे दिले आहेत ते ध्रुवला एका महिन्यात २० टक्के व्याजासहीत परत करायचे आहेत. पण ध्रुवने मात्र आकाशकडून घेतलेले सर्व पैसे त्याला दिले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आकाशचे म्हणणे आहे. त्यानुसार त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे आणि आता पोलिस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लंडसोबत, कॅप्टन रोहितसह टीम इंडियाचे खेळाडू लखनऊला पोहोचले

यापूर्वी भारताचा क्रिकेटपटू दीपक चहरच्या वडिलांनीही अशीच एक तक्रार केली होती. ही तक्रार या पारीख कुटुंबियांविरोधातच होती. त्यामुळे आता पोलिस या प्रकरणाचा तपास मूळापासून करत असल्याचे समोर येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *