मुंबई: काही आठवड्यांपूर्वी सुरू झालेला बस बाई बस हा सेलिब्रिटींच्या गप्पांचा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे.विविध क्षेत्रातील यशस्वी महिला या शोमध्ये दिलखुलास गप्पा मारताना दिसतात.अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमात सुत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे. राजकीय, तसंच सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज महिलांनी या शोमध्ये हजेरी लावल्याचं दिसून आलं. मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी हिनं नुकतीच या शोमध्ये हजेरी लावली होती.


सोनालीनं अनेक विषयांवर गप्पा मारल्या, अनेक भावुक करणारे क्षणही आले. पण सध्या चर्चा सुरू आहे ती, सोनाली आणि अमृता खानवीलकर यांच्यात मैत्री आहे की वैर याची. मराठी सिनेसृष्टीतील या दोन्ही आघाडीच्या नायिका एकमेकींच्या कट्टर स्पर्धक असल्या तरी त्यांच्या मैत्री नाही, असं अनेकदा ऐकायला आलं होतं. आता यावर सोनाली स्पष्टच बोलली आहे.
असं कुठं असतंय व्हय…नव्यानं सुरू झालेल्या मराठी मालिकेला प्रेक्षकांनी केलं ट्रोल

बस बाई बस या शोमध्ये आलेल्या पाहुण्यांना काही व्यक्तींचे फोटो दाखण्यात येतात. या फोटोंशी त्यांना संवाद साधायचा असतो, किंवा मनात असलेल्या काही गोष्टी शेअर करायच्या असतात. सोनालीला अमृताचा फोटो दाखवण्यात आलाय. हा फोटो पाहून सोनालीनं अशी काही प्रतिक्रिया दिली की, सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे.

काय म्हणाली सोनाली?
अमृताचा फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला सोनालीला काय बोलावं काही सुचलं नाही. त्यानंतर तिनं अमृताचा फोटो दाखवणार याची खात्री होती, असं म्हणत बोलायला सुरुवात केली. सोनाली जे आहे ते अगदी स्पष्टपणे बोलली.
बंद करा आता मालिका…नवीन मेहता साहब पाहून प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात
आपण आपल्या करिअरची सुरुवात एकत्र केली. आपण एकमेकींचा स्ट्रगल पाहिला. नटरंगचं यश आपण शेअर केलं. पण त्यानंतर इतक्या वर्षात आपण एकत्र काम केलं नाही. एकत्र काम केलं असतं तर कदाचित आपल्यात छान मैत्री झाली असती. पण आपण कधी एकमेकींच्या सहवासात आलोच नाही. नटरंगनंतर आपल्यात वैर असल्याचं पसरवलं गेलं. पण दोन यशस्वी अभिनेत्रींना एकत्र पाहणं लोकांना आवडत नसावं, असं म्हणत सोनालीनं अमृताला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.