Ira Khan Proposal Video: आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. इरा सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. पण इरा (Ira Khan) आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा आपल्या खाजगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. नुकतेच तिचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तीच्या बॉयफ्रेंडने तिले प्रपोज केले आहे. इरा 2020 पासून नुपूरला डेट करत आहे. नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. नुकतंच इराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर (Video Viral) केला आहे, ज्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखर (Nupur Shikhare) तिला हटके अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडींच्या देखील प्रपोजल युनिक पद्धतीने प्रपोज केले आहे. बॉलिवूड सेलिब्रेटिंच्या या प्रपोज करण्याच्या युनिक स्टाईल पाहून तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला प्रपोज करु शकता. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया, @twinklerkhanna, @tahirakashyap)

राहूल वैद्य आणि दिशा परमार

प्रसिद्ध गायक राहूल वैद्य आणि दिशा परमार यांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडते. एका मुलाखतीत राहुलनं सांगितलं, ‘त्यानं एकदा दिशाला म्युझिक कॉन्सर्टमध्ये भाग घ्यायला पुण्याला बोलावलं होतं. तिच्याबरोबर क्वालिटी टाइम घालवता येईल आणि एकमेकांना समजून घेता येईल. अशी त्याची भावना होती. पण जेव्हा राहुल वैद्य जेव्हा बिग बॉस १४ शोमध्ये गेला, तेव्हा त्याला तू दिशाला डेट करतोयस का, असं विचारलं. तेव्हा तो नाही म्हणाला. उलट बिग बॉसच्या घरात प्रेम शोधायला आलोय असं म्हणाला होता. पण सरते शेवटी राहूलने दिशाला प्रपोज केले आणि तिच्याशी लग्न देखील केले.

(वाचा :- PM Modi Birthday : आयुष्य कितीही बिझी असो पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आईला ‘ही’ गोष्ट आर्वजून देतात)

​प्रियांका चोप्रा आणि निक जोनास

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची जोडी बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे. या दोघांनी जेव्हा लग्न केले तेव्हा खूप चर्चे करण्यात आली होती. निकने प्रियांकाला खूपच युनिक पद्धतीने प्रपोज केले आहे. निकने यावेळी प्रियांकाला तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ग्रीकच्या एका आयलँडवर घेऊन गेला होता. तिथे त्याने प्रियांकाला एकदम हटके अंदाजात प्रपोज केले होते. यावेळी निकने गुडघ्यावर बसून प्रियांकाला ती जगातील सर्वांत सुंदर स्त्री आहे ही गोष्टी तिला सांगितली होती. त्यावेळी तिला त्याने लग्नासाठी प्रपोज केले. तु्म्ही देखील असे करु शकता. यामुळे तुमच्या दोघांचे नाते खूपच खास होईल.

(वाचा :- 6 घटस्फोटीत पुरुषांनी सांगितले त्यांचे थरारक अनुभव, लग्न वाचविण्यासाठी या चुका टाळाच)

​अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन

बॉलिवूडची क्वीन ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सुंदर दिसण्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला खूपच युनिक पद्धतीने प्रपोज केले. आज त्यांच्या लग्नाला 14 वर्ष उलटून गेली आहेत. पण अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही आजही अनेकांची फेव्हरेट जोडी आहे. अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी आम्ही न्यूयॉर्कमध्ये ‘गुरू’या चित्रपटाची शूटिंग करत होतो. मी एके दिवशी हॉटेल रूमच्या मोठ्या खोलीत उभा होतो आणि विचार करत होतो की, जेव्हा आम्ही दोघेही लग्न करून असा विचार करत होते. त्यानंतर गुरु या चित्रपटाच्या रिलीझ झाल्यानंतर त्याच हॉटेलच्या बाल्कनीमध्ये ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर आमचे लग्न झाले. आता रणबीर कपूर आणि आलियाने देखील त्याच्या घराच्या बाल्कनीमध्येच लग्न केले.

(वाचा :- पतीची फसवणूक केल्याची 5 महिलांनी स्वत: दिली कबुली, कारणं ऐकून अंगावर सर्रकन काटा येईल)

​करीना कपूर आणि सैफ अली खान

नवाब सैफ अली खान याने करीना कपूरला २ वेळा प्रपोज केले होते, ही गोष्ट खूपच कमी लोकांना माहित आहे. सैफने करिनाला पॅरिसमध्ये प्रपोज केले होते. जिथे त्याचे वडील मंसूर अली खान पतौडी यांनी सैफची आई शर्मिला यांना प्रपोज केले होते. तिथेच सैफने करीनाला प्रपोज केले.

(वाचा :- मूल झाल्यावर आयुष्यातील रोमान्स गायब झालाय? मग नात्याला द्या असा तडका, जुने प्रेम पुन्हा नव्याने मिळेल)

​आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप

अभिनेता आयुषमान खुराना आणि दिग्दर्शिका ताहिरा कश्यप यांनी खूप वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले होते. दोघेही कॉलेज वयापासून एकमेकांवर प्रेम करत होते. आयुषमान हा लाजाळू स्वभावाचा होता. परंतु तरीही त्याने ताहिराला कँडल लाईट डिनर डेटवर प्रपोज केले होते. आज आयुषमान एक परफेक्ट फॅमिली मॅन आहे.

(वाचा :- घरातील कामं महिलांपेक्षा पुरुषांना जास्त चांगली यावीत, असं का म्हणाल्या असतील सुधा मूर्ती जाणून घ्या)

​अक्षय-ट्विंकल खन्ना

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या प्रपोजलची कहाणी खूपच मजेशीर आहे. असे म्हटले जाते की, ‘मेला’ चित्रपटादरम्यान अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले होते, तेव्हा चित्रपट फ्लॉप झाला तरच तिच्याशी लग्न करणार असल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते. जणू काही अक्षयला हा चित्रपट फ्लॉप व्हावा अशी इच्छा होती. गंमत म्हणजे ‘मेला’ चित्रपट खरंच फ्लॉप झाल्यावर ट्विंकलही अक्षयला हो म्हणाली.

(वाचा :- घरातील कामं महिलांपेक्षा पुरुषांना जास्त चांगली यावीत, असं का म्हणाल्या असतील सुधा मूर्ती जाणून घ्या)

​बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरची भेट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. दोघेही थायलंडला सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. तिथे 31 डिसेंबरला करणने बिपाशाला अंगठी देऊन प्रपोज केले होते.करण तब्बल 10 मिनिटे गुडघ्यावर बसला होता त्यावेळी बिपाशा म्हणाली होती. शेवटी बिपाशाने करण सिंग ग्रोवरला होकार दिला. बिपाशा आता लवकरच आई होणार आहे.

(वाचा :- माझी कहाणी: माझी पत्नी अतिशय आळशी आहे, ती कोणतेच काम करत नाही, मी हैराण झालो आहे)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.