मुंबई: बॉलिवूड संगीत विश्वात रॅपिंगलाही महत्त्वाचे स्थान आहे. या क्षेत्रात रॅपर बादशाहचे (Rapper Badshah) नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या भारतीय पॉप स्टारची गाणी रीलिज होताच वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. सोशल मीडियावरही या गाण्यांचा बोलबाला असतो. भारतातच नव्हे परदेशातही बादशाहची फॅन फॉलोइंग आहे. मात्र आता त्याची गाणी ऐकायला मिळणार की नाही, अशी चिंता चाहत्यांना सतावू लागली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बादशाहने सोशल मीडियावर केलेली पोस्ट.

एखादी पार्टी असो वा लग्न, असं होतंच नाही की बादशाहाची गाण्यावर डान्स केला जात नाही. मात्र आता त्याच्या एका पोस्टमुळे चाहते चिंतेत आहेत. बादशाह संगीत क्षेत्रातून ब्रेक घेतोय की काय, असा प्रश्न पडला आहे. कारण त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली असून ज्यात त्याने म्हटलं की, ‘Taking A Break’ (विश्रांती घेतोय). त्याच्या या पोस्टची विशेष चर्चा होते आहे.

हे वाचा-विवाहित सुपरस्टारच्या प्रेमात वेड्या होत्या टीना मुनीम; ब्रेकअप करताना दिलं खास गिफ्ट

आता बादशाह रॅपिंगमधून ब्रेक घेतो आहे की सोशल मीडियापासून त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. पण तो सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतो. अपकमिंग गाणी, रिअॅलिटी शो याविषयी तो त्याच्या चाहत्यांना अपडेट देतो. त्यामुळे चाहते गोंधळात आहेत की नेमका हा ब्रेक तो कशापासून घेतो आहे.

Badshah Instagram

गेल्या अनेक दशकांपासून बादशाहने बॉलिवूड संगीत क्षेत्रात विशेष नाव कमावले आहे. आता त्याने यातूनच ब्रेक घेतल्यास त्याच्या कोट्यवधी चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.