मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान लग्न कधी करणार याकडे त्याचे चाहते डोळे लावून बसले आहेत. बॉलिवूडमधील सलमान मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. असं जरी असलं तरी त्याच्या चाहत्यांच्या मते प्रेमाच्या बाबतीत सलमान खान अतिशय दुर्दैवी आहे. सलमानच नाव ऐश्वर्या राय पासून कतरिना कैफपर्यंत जोडण्यात आलं होतं. परंतु आजही त्याचं लग्न झालेलं नाही. अलिकडेच एका कार्यक्रमात सलमानला एक महिला पत्रकारानं त्याला थेट लग्नाची मागणी घातली.

अबूधाबी इथं झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खान सहभागी झाला होता.त्यावेळी तिथं आलेल्या एका महिला पत्रकारानं सलमानला सांगितलं की, ती हॉलिवूडमधून आली आहे आणि तुला पाहताच क्षणी प्रेमात पडली आहे. हे ऐकल्यानंतर सलमान तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिला विचारतो की, तू शाहरुख खानबद्दल बोलत आहे का? त्यावर ती म्हणते की नाही. ती त्याच्याचबद्दल बोलत आहे.

लग्नाबद्दल सलमान खान म्हणाला की…

त्या नंतर त्या महिला पत्रकारानं सलमानला विचारलं की, ‘माझ्याशी तू लग्न करशील का?’ त्यावर सलमान तिला म्हणाला की, ‘माझं लग्न करण्याचं वय उलटून गेलं.’ याचं कारण विचारलं असता सलमान म्हणाला की, २० वर्षांपूर्वी जर ती भेटायला हवी होती. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

युलिया आणि सलमान खान

याच कार्यक्रमात सलमानला त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरला विचारण्यात आलं की, सलमाननं काय घातलं आहे. आधी ती उत्तर देताना अडखळत होती.परंतु नंतर तिनं हसत हसत सांगितलं की, ‘सलमान जे काही घालतो ते त्याला कायमच चांगलं दिसतं.’

Vicky Kaushal Video: जसं दिसतं तसं असतंच असं नाही.. सलमानच्या व्हिडिओवर अखेर बोलला विकी कौशल

सलमानचं होणार होतं लग्न
कॉफी विथ करण कार्यक्रमात एका सलमाननं सांगितलं होतं की,खरं तर त्याला सलमान खानशी लग्न करायचं होतं. त्याचं लग्न जवळपास ठरलं देखील होतं परंतु ते होऊ शकलं नाही.

मी वेळेत येते; पापाराझी उशिरा आले, उर्फी चिडली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *