मुंबई- मराठी सिनेमातील अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी म्हटलं की काहीतरी हटके बघायला मिळणार याची आता तिच्या चाहत्यांना सवयच झाली आहे. छंद लागला म्हणत सोशलमीडियावर तुफान हिट झालेल्या सोनालीच्या डान्सचा, अभिनयाचा, भूमिकेचा इतकच नव्हे तर तिच्या लग्नापासून हनिमून डायरीतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा जणू तिच्या चाहत्यांना छंदच लागला आहे.

कोण आहे आमिरचा होणारा मराठमोळा जावई नुपूर शिखरे, काय करतो काम?

आता सोनाली कोणत्या नव्या रूपात येणार याची उत्सुकता असलेल्या चाहत्यांना लवकरच एक जबरदस्त ट्रीट मिळणार आहे. येत्या काही दिवसांत सोनाली कुलकर्णी केळ्याची टोपली डोक्यावर घेऊन ठुमके मारताना दिसणार आहे. कधी, कुठे हे पाहण्यासाठी मात्र चाहत्यांना थोडा धीर धरावा लागणार आहे.


मराठी विनोदी सिनेमातील बादशहा म्हणून ओळखले जाणारे दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांनी आणि त्यातील ठसकेबाज गाण्यांनी एक काळ गाजवला. विशेष म्हणजे आजही दादा कोंडके यांच्या गाण्यांवर थिकरण्याचा मोह आवरत नाही. त्यात ‘केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का?’ हे गाणं तर दादांच्या सिनेमातील मास्टरपीस. दादा कोंडके आणि उषा चव्हाण या जोडीने अनेक गाण्यांमध्ये धमाल केलीय त्यापैकीच हे गाणं. दादांच्या सिनेमातील तीच केळेवाली बनणार आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. आता तुम्ही म्हणाल की, पांडू हवालदार हा दादा आणि उषा या जोडीचा सिनेमा पुन्हा येणार आहे का? पण असं काही नाहीय. सोनाली पांडू हवालदार या सिनेमातील केळेवाली गाण्यावर डान्स करणार आहे.


सोनालीचा डान्स म्हटलं की प्रेक्षकांना पर्वणीच. हीच पर्वणी अनुभवता येणार आहे झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात. येत्या ९ ऑक्टोबरला झी टॉकीज या वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कॉमेडी अॅवार्ड असल्याने विनोदी सिनेमांचा श्वास असलेल्या दादा कोंडके यांची गाणी, डायलॉग अशी या सोहळ्यातील मनोरंजनाची थीम आहे. यामध्येच सोनाली पांडू हवालदारवर फिदा असलेल्या केळेवालीच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणार आहे.

अभिनेत्याने केली आईची हत्या, पंतप्रधानांना मारण्याचीही होती तयारी

गेल्या वर्षी दादा कोंडके यांच्या पांडू हवालदारची आठवण म्हणून विजू माने यांनी पांडू हा सिनेमा पडद्यावर आणला होता. भाऊ कदम याने यामध्ये पांडूची भूमिका वठवली होती. त्या नव्या पांडू सिनेमातही केळेवाली प्रेक्षकांना भेटली ती सोनालीच्या रूपात. केळेवालीचा तो मॉडर्न ठसकाही प्रेक्षकांना खूप आवडला. राया तुमच्या फॅमिलीत, केळेवालीला घेणार का अशी लाडीक विनवणी करणारी सोनाली हिट झाली. तिच्या डान्स स्टेप्सवर सोशलमीडियावर कित्येक रिल्स बनले.

आता पुन्हा एकदा सोनाली केळेवाली होणार आहे पण ती पांडू हवालदारची. उषा चव्हाण यांच्यावर चित्रित झालेल्या केळेवाली गाण्यावर सोनालीला थिरकताना पाहण्यासाठी तिचे चाहते वाट पाहत आहेत. मी तर भोळी अडाणी ठकू म्हणत सोनालीचा केळेवाली ठसका झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या मंचावर जाळ आणि धूर एकत्रच काढणार हे तिच्या रिहर्सलमध्येच दिसलं.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.