अब्दुल सत्तार यांची मध्यस्थी फळाला?:मनोज जरांगे यांची फोनवरून फडणवीसांसोबत चर्चा; आज सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशिरा भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. यांच्या चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटल्यानंतर आता अब्दुल सत्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जरांगे पाटील विरुद्ध सरकार वादामध्ये तोडगा निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला राज्यात मोठ्या प्रमाणात पराभव सहन करावा लागला होता. राज्यातील अनेक मतदारसंघावर मराठा आंदोलनाचा परिणाम झाल्याचे या माध्यमातून दिसून आले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलकांचा रोष कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. तसेच अब्दुल सत्तार यांची घेतलेला हा पुढाकार फळाला जातो का? याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आमच्यात चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत काही ना काही तरी तोडगा काढावा लागेल, असे मत अब्दुल सत्तार यांनी देखील यावेळी व्यक्त केले. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचे नेमके काय फलित निघते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आज मंत्रिमंडळात देखील चर्चा शेतकऱ्यांच्या आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज मंत्रिमंडळ बैठकीत देखील चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यापूर्वीच अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुका लांबल्या असल्या तरी देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला कालावधी संपायाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते, हे पहावे लागेल. एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील ते मुख्यमंत्र्यांना देण्याची शक्यता आहे. तसेच याबाबत काही तोडगा निघतो का? याची देखील चाचपणी सरकारच्या वतीने करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचे देखील सूत्रांनी म्हटले आहे. मंत्री सत्तार 100 गाड्यांचा ताफा घेऊन पोहोचले होते जरांगेंच्या भेटीला बुधवारी रात्री मंत्री अब्दुल सत्तार यांनी 100 गाड्यांचा ताफा घेऊन आंतरवाली सराटी गाठले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. बुधवारी रात्री दहा वाजता मंत्री सत्तार 100 गाड्यांचा ताफा घेऊन अंतरवाली सराटीत आल्याने,राजकीय जाणकारांमध्ये चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, सत्तार व जरांगे यांच्यामध्ये या वेळी चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजू शकला नाही .मंत्री सत्तार यांचा ताफा आंतरवालीत रात्री दाखल झाला, त्यावेळी जरांगे पाटील नुकसानीच्या पाहणीसाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे सत्तार यांना दीड तास प्रतीक्षा करावी लागली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अब्दुल सत्तार व जरांगे पाटील यांच्या भेटीमुळे अनेक तर्क- वितर्क लावले जात होते. रात्री उशिरापर्यंत दोन्ही नेत्यांची बैठक सुरू होती.