अबू आझमी व वाल्मीक कराड यांचा केला निषेध:आंबेटाकळी येथे शिंदेसेनेतर्फे आंदोलन

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या विरोधात शिंदे सेनेच्या वतीने शनिवारी आंबेटाकळी फाट्यावर तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी अबू आझमी यांच्याबद्दल निषेध व्यक्त केला. तसेच वाल्मीक कराडला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख चेतन ठोंबरे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कावेरी वाघमारे, सोपान वाडेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री देशमुख, वैशाली घोरपडे, बाळू पाटील, विलास देशमुख, नीतेश खरात, विष्णुदास कदम, सागर मेतकर, चेतन शेलकर, नामदेव टाले, मयूर खंडारे, नारायण टिकार, प्रभू घोंगे, प्रवीण पोरे, नितीन मानकर, शिवा बाराहाते, मनोहर आखरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.