चीन : आंतरराष्ट्रीय जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका भीषण बस अपघातामध्ये तब्बल २७ जणांनी आपला प्राण गमावला आहे. चीनमध्ये घडलेल्या या अपघाताने प्रचंड जीवितहानी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक प्रवासी बस उलटली आणि बसमधील २७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. चीनच्या दक्षिण-पश्चिम भागातील एका एक्स्पेस महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातानंतर आता स्थानिक पोलीस आणि बचाव यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाली आहे. पुढील कारवाई केली जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची मदत घेण्यात येत आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेस महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याची माहिती मिळत आहे.

साताऱ्यात शिंदे गटाची सरशी, मात्र नंदुरबारमध्ये भाजपच्या गावितांनी दिला धक्का

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. २७ जणांचा एकाच वेळी बस अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला, याचाही तपास आता केला जात आहे. २०२२ या वर्षात चीनमध्ये झालेला आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा अपघात असल्याचं एएफपी या वृत्त संस्थेने सांगितलं आहे.

मला कारस्थानाने मुख्यमंत्री पदावरून काढले आणि राज्यपाल पदी पाठवलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.