आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायची का?:एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीला टोला
विरोधकांना दोन्ही बाजूंनी बोलायची सवयच आहे. बदलापूर प्रकरणात आधी म्हणत होते. आरोपीला भरचौकात फाशी द्या. आता आरोपीने पोलिसांवरच गोळीबार केला तर पोलिसांनी बंदूकी शोकेसमध्ये ठेवायच्या का, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगी मविआला लगावला आहे. सीएम एकनाथ शिंदे म्हणाले की, पुणे मेट्रोचा कार्यक्रम खरेतर गुरुवारी होणार होता. परंतू पावसामुळे उद्घाटन होऊ शकले नाही. सर्वकाही तयारी होती. परंतू लोकांना त्रास होईल म्हणून पंतप्रधानांनी स्वत: हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती केली.परंतू विरोधक दोन्ही बाजूंनी बोलतात. आम्ही करतो उद्घाटन असे विरोधक बोलू लागले. दोन्ही बाजूंनी बोलतो चालतो त्याला काय म्हणतात? असा सवाल करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. नेमके सीएम काय म्हणाले? एकनाथ शिंदे म्हणाले की, बदलापूर प्रकरण घडल्यानंतर आरोपीला फाशी द्या, असं विरोधक म्हणत होते. त्यानंतर आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलिसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायची का? पोलिसांनी समजा ते केलं नसतं तर विरोधकच म्हणाले असते की चार लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला. मग पोलिसांची बंदूक काय शोसाठी ठेवली का? म्हणजे विरोधक इकडून पण बोलतात आणि तिकडूनही बोलतात योजनेत खोडा घालणाऱ्यांना बहिणीच जोडा दाखवतील एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडक्या बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना बहिणी जोडा दाखवतील. या योजनेचा राज्यातील लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना हातभार लागणार आहे. लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लावण्यासाठीची ही योजना आहे. ही योजना बंद होणार नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांना विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र डागले.