जम्मू : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emran Hashmi) त्याच्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आहे. दिवसभरातील चित्रीकरण आटोपून पहलगामच्या बाजारपेठेत तो फिरायला गेला होता. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यासह इतरांवर दगडफेक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इमरान हाश्मी चित्रपटाचं चित्रीकरण आटोपल्यानंतर इतर सहकाऱ्यांसह पहलगामच्या बाजारपेठेत गेला होता. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी इमरान हाश्मी आणि इतरांवर दगडफेक केली. याप्रकरणी पहलगाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कलम १४७, १४८, ३७०, ३३६, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

इमरान हाश्मी त्याचा चित्रपट ग्राऊंड झिरो या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पहलगाममध्ये आला होता. तो चित्रपट बॉर्डर सिक्युरिटी फोर्सवर आधारित आहे. पहलगाम पूर्वी इमरान खान श्रीनगरमध्ये चित्रीकरण करत होता. श्रीनगरमध्ये त्यानं १४ दिवस चित्रीकरण केलं होतं.

दूध पोळीवरून आईसोबत वाद; नाराज मुलानं आयुष्य संपवलं, पत्नीनंही टोकाचं पाऊल उचललं

श्रीनगरच्या एसपी कॉलेजमध्ये चित्रीकरण देखील करण्यात आलं होतं. तिथं चित्रीकरण संपल्यानंतर इमरान खाननं त्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांकडे पाहिलं देखील नव्हतं अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. एका वेबसाईटनं याबाबत वृत्त प्रकाशित केलं होतं. आम्ही अभिनेत्याला पाहायला आलो होतो, इमरान हाश्मीनं त्यांच्याकडे पाहिले, देखील नाही, असा दावा करण्यात आला होता. ग्राऊंड झिरो चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देऊस्कर करत आहेत. इमरान हाश्मीसोबत सई ताम्हणकर आणि जोया हुसेन त्या चित्रपटात अभिनय करत आहेत.

धीरजला धीर धरवेना, iPhone 14 Pro खरेदीसाठी भारतातून थेट दुबई गाठली

इमरान हाश्मीनं यापूर्वी राज, मर्डर, जहर, आशिक बनाया आपने, कलयुग आणि गँगस्टर चित्रपटात काम केलं आहे. डिबुक चित्रपटात देखील त्यानं काम केलं होतं. आगामी काळात इमरान खान अक्षयकुमारच्या सेल्फी या चित्रपटात देखील दिसणार आहे. सलमान खानच्या आगामी टायगर ३ या चित्रपटात देखील तो काम करताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. टायगर ३ मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ देखील असणार आहे.

दरम्यान, पहलगामच्या बाजारपेठेत फिरताना इमरान हाश्मी आणि इतर सहकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. तर, श्रीनगरमध्ये त्याचे चाहते नाराज झाले होते.

आयटीची धाड अन् भाजप प्रवेशाच्या चर्चा, अभिजीत पाटलांना पवारांनी थेट गाडीत शेजारी बसवलं अन्… 94224744Source link

Leave a Reply

Your email address will not be published.