‘त्याचे हात त्याच्या डोक्याच्या मागे बांधले गेले होते आणि त्याला एका ट्रंकमध्ये बंद करण्यात आलेले, जो त्याच्या घरात असणाऱ्या बॉक्ससारखा दिसत होता’, अशी माहिती जेफरसन मचाडोच्या कुटुंबाचे वकील जैरो मगलहास यांनी दिली. दरम्यान जेफरसनच्या मृतदेहाची ओळख बोटांच्या ठशावरुन झाली. त्याच्या मानेवरही खूणा आढळल्या असून त्यावरुन असा अंदाज बांधला जातोय की गळा घोटून त्याची हत्या करण्यात आली.
जेफरसच्या कुटुंबाकडून करण्यात आलेल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘जेफरसनची निर्घृण हत्या ईर्ष्या बाळगणाऱ्या, दुष्ट आणि नक्कीच बेईमान लोकांनीच केली आहे. अधिक माहिती लवकरच कळेल, आरजे टाऊनशिप पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येक छोट्या तपशीलात मदत करणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार.’
रिपोर्टनुसार, पोलिस सध्या ती प्रॉपर्टी ज्याला भाड्याने दिली होती, त्याची चौकशी करत आहेत. एवढेच नव्हे तर आरोपीला महिनाभरापूर्वी घरात प्रवेश करतानाही दिसला होता. महत्त्वाची बाब म्हणजे तो अभिनेत्याला ओळखत होता. दरम्यान जेव्हापासून जेफरसन गायब होत्या तेव्हापासून कित्येक महिन्यांपर्यंत कुटुंबाला एका व्यक्तीकडून मेसेज येत होते, जो जेफरसन म्हणून त्यांच्याशी संपर्क करायचा. त्याची आई, मारिया दास डोरेसला त्याच्या इमेलबाबत संशय आलेला, कारण त्यामध्ये शुद्धलेखनाच्या चुका असायच्या. ज्या चुका त्यांच्या मुलाकडून कधी व्हायच्या नाहीत.