अक्षय कुमारची संपत्ती किती?
अक्षयने त्याच्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. सुपरहिट सिनेमांतून अक्षयने कोट्यवधींची कमाई केली. अक्षय इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो एका सिनेमासाठी ८० ते १०० कोटी रुपये फी घेतो. त्याची वर्षाची कमाई जवळपास ५०० कोटी रुपये आहे. तर त्याची एकूण संपत्ती २५९१ कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
सिनेमांशिवाय अक्षय ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कोट्यवधींची कमाई करतो. तो सोशल मीडियावर एका पोस्टसाठी जवळपास १ कोटी फी घेतो. त्याशिवाय अक्षय केप ऑफ गुड फिल्म्स नावाच्या प्रोडक्शन हाउसमध्ये पार्टनर आहे. अक्षयचं मुंबईतील जुहूमध्ये अलिशान घर आहे. त्याशिवाय त्याचे मुंबईत चार फ्लॅट, एक बंगला आणि एक डुप्लेक्स आहे. याची किंमत जवळपास १०५ कोटी रुपये आहे. त्याशिवाय गोव्यातही त्याचे बंगले आहेत. परदेशात अक्षयची मॉरिशस आणि टोरंटोमध्ये एक घर आहे.
सर्वाधिक टॅक्स भरणारा कलाकार
अक्षय कुमार फिल्म इंडस्ट्रीत सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अक्षय दरवर्षी कोट्यवधी रुपये टॅक्स भरतो. आतापर्यंत मी अतिशय मेहनत आणि ईमानदारीने सर्वकाही कमावलं आहे आणि टॅक्सही भरला आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून अक्षयचा सन्मानदेखील करण्यात आला होता.