मुंबई– छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री राधा सागर हिने नुकतीच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. एक पोस्ट करत तिने चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. राधा लवकरच आई होणार आहे. तिने खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत आपला आनंद शेअर केला आहे. राधा ही ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसली होती. ती अभिषेकची गर्लफ्रेंड दाखवण्यात आली होती. तिचं आणि अभिषेकचं मालिकेत लग्नही झालं होतं. आता राधाने तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. महत्वाचं म्हणजे आज राधाचा वाढदिवस आहे आणि याचं दिवशी तिने तिच्या पतीसोबत छानसा व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


राधा यापूर्वी अनेक भूमिकांमध्ये दिसली. मात्र तिच्या ‘आई कुठे काय करते’ मधील भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत दिसली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी तिने मालिकांमधून ब्रेक घेतला होता. त्याचं कारण तिने उघड केलं नव्हतं. मात्र चाहते तिच्या जाण्याने नाखूष होते. आता अखेर तिच्या त्या निर्णयामागचं कारण समोर आलं आहे. तिने तिचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, ‘सगळ्यात चांगली बातमी द्यायला सगळ्यात चांगला दिवस. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि गुडन्यूज अशी आहे की कुणीतरी येणार गं.’ त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी फोटोशूट करत त्याचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला.


आता चाहत्यांनी तिच्यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. राधाने हटके स्टाइलने दिलेल्या या बातमीने चाहतेही खुश झाले आहेत.

कार्तिक अन् कियाराच एकत्र दिसणार, चित्रपट लवकरच

वहिनी भाऊ फायनलला गेलाय, आता… वडापाव खाणाऱ्या सायली संजीवला पाहून चाहत्यांच्या भन्नाट कमेंट





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *