तिरुपतीच्या लाडूत भेसळीसारखे कृत्य हिंदू धर्मासाठी पाप- रामनाथ कोविंद:माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली गंभीर चिंता

तिरुमलामध्ये अशुद्ध लाडू वाटपावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ते वाराणसी येथे बोलत होते. ते म्हणाले, कदाचित देशातील प्रत्येक मंदिरात असेच घडत असावे. त्यामुळेच अशा प्रकरणात सखोल तपासाची गरज आहे. कोविंद बनारस हिंदू विद्यापीठाच्या शताब्दी सभागृहात आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे काही सहकारी गेल्या रात्री बाबा विश्वनाथ धामला गेले होते. रात्री ते परतले. त्यांना मला तेथील प्रसाद दिला. तेव्हा तिरुमला मंदिराच्या प्रसादाची आठवण आली. त्यामुळे प्रसाद घेताना याविषयीच्या भावना आल्या होत्या. खरे तर धर्मग्रंथांत अशा भेसळीला पाप मानले गेले आहे. अशा घटना रोखण्याची गरज आहे, असे कोविंद म्हणाले. परंतु बाबा विश्वनाथ यांच्या प्रसादावर अतूट श्रद्धा व भक्ती असल्याची भावना देखील कोविंद यांनी या प्रसंगी व्यक्त केली. सध्या तिरुपती मंदिरात मिळणारा प्रसादमच्या लाडूत चरबीयुक्त तूप असल्याचे प्रकरण चर्चेत आहे. दुसरीकडे कर्नाटकच्या हुबळीत केंद्रीय खाद्य मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, भारत सरकारने प्रसिद्ध तिरुपती प्रसादमच्या अपमानाचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा घेतला जाईल. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आता सविस्तर तपास होणार आहे. केंद्रीय मंत्री बी.एल. वर्मा म्हणाले, भेसळ करणारे गुन्हेगार आहेत. त्यांनी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment