मुंबई: ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे, शिवाय तिच्या आयुष्यातील विविध अपडेट वाऱ्याच्या वेगाने माध्यमांमध्ये व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी ती फूड अॅलर्जीमुळे रुग्णालयात दाखल झाल्याचे समोर आले होते. आता अभिनेत्रीने या वृत्ताला दुजोरा देताना नेमकी तिची अवस्था काय आहे याबाबत पोस्ट शेअर केली. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसते आहे की अदाच्या हातापायावर पुरळ उठलेय. आता यामुळेच अदाने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला, याशिवाय ती ब्रेक घेऊन आयुर्वेदिक उपचार घेणार आहे. जाणून घ्या काय म्हणाली अदा…

नितीन देसाईंना अचानक बॉबी देओलचा ‘बरसात’ पाहण्याची आलेली हुक्की अन्… नागपूरकरांच्या खास आठवणी
अदाने इन्स्टाग्रामवर ट्रिगर वॉर्निंग देत काही फोटो शेअर केलेत, ज्यामध्ये तिच्या हातापायावर उठलेले पुरळ दिसते आहे. अदाने असे कॅप्शन दिले की, ‘सर्वांना धन्यवाद, कुठून कुठून मला मेसेज आले आणि काही लोक तर असे आहे ज्यांना मी कित्येक वर्षात भेटलेदेखील नाही. शिवाय अदा फॅन क्लॅब… डिस्क्लेमर- त्वचेवर उठणाऱ्या रॅशची भीती वाटत असेल तर पुढील फोटो पाहण्यासाठी स्वाइप करू नका, काही भीतीदायक फोटो आहेत. मात्र मी विचार केला की फक्त सुंदरच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले नाही पाहिजेत.’

रिंकू राजगुरुने याआधी कधीच पाहिलं नव्हतं नाटक; पहिल्या अनुभवानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली…
अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘मी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, Hives आले होते. हे एक भयंकर पुरळ आहे. त्यामुळे फुल स्लीव्ह्ज घालून ते मी लपवत होते, आता ते तणावामुळे चेहऱ्यावरही उठले आहे. त्यामुळे मी औषध घेतलं आणि त्यानंतर लक्षात आलं मला त्या औषधाची अॅलर्जी आहे, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात उलटी झाली. त्यामुळे मी दुसरे एक औषध आणि इंजेक्शन घेईन, फुल स्लीव्ह्ज आणि पाय झाकून मी आज मी प्रमोशन करेन.’ अभिनेत्रीने ही पोस्ट ४ ऑगस्ट रोजी केली होती.


यामध्ये तिने पुढे असेही लिहिले की, ‘यानंतर मी माझ्या अम्माला वचन दिलं की मी माझ्या आरोग्याची काळजी घेईन. त्यामुळे मी काही दिवसांचा ब्रेक घेते आहे. अम्माने सांगितले आहे की रेडिओ ट्रेल्स, झूम इंटरव्ह्युज, प्रोमो शूट हे आता बस झालं, आता आरोग्याची काळजी घे. त्यामुळे मी आयुर्वेदीक उपचारासाठी जात आहे. मी लवकरच परत येईल. तोपर्यंत कमांडोमधील BTS इन्स्टाग्रामवर अपडेट करत राहीन. पुढील प्रोजेक्ट याच महिन्यात सुरू होतोय, भावना रेड्डीला त्यासाठी रेडी व्हायचं आहे.’

Adah Sharma On Break

अदाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरीही शेअर केली असून ज्यात तिने लिहिले आहे की ती काही दिवसांच्या ब्रेकवर असून लवकरच ती सर्वांना पुन्हा एकदा भेटेल. अभिनेत्रीच्या आरोग्याविषयीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट करताहेत. तिला लवकरात लवकर बरं वाटावं याकरता चाहते प्रार्थना करत आहेत.

हटके बॅग, ऑल पिंक लूकमध्ये ‘बार्बी’ पाहण्यासाठी पोहोचली अदा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *