सोलापूर: वारंवार दारूसाठी पैसे मागून वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाचा चिडलेल्या वडिलांनी धारदार शस्त्राच्या साह्याने खून केल्याची घटना सोलापूरात घडली. मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करून वडिलांनी लेकाले संपवले. व्यसनी मुलामुळे संपूर्ण कुटुंब वैतागून गेले होते.

रविवारी रात्री संताप अनावर झाल्याने बापाने मुलाच्या गळ्यावर- मानेवर चाकूने सपासप वार करत जखमी केले होते. अतिरक्तस्राव झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी उपचार सुरू असताना-जखमी व्यसनी मुलाची प्राणज्योत मालवली. अंगावर काटा आणणारी घटना एफ ग्रुप लक्ष्मी चौक जुना विडी घरकुल या परिसरात रात्री घडली होती. श्रीनिवास मल्लव्या यासम (वय ३२) असे मयत मुलाचे नाव आहे.

किरकोळ वाद विकोपाला; तरुणाच्या डोक्यात सपासप तलवारीचे वार, गोणीमध्ये भरून शस्त्र आणली
दारूच्या व्यवसनाने अख्ख कुटुंब वैतागून गेले होते

श्रीनिवास यासम याला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे अख्ख कुटुंब वैतागून गेले होते.आरोपी मलय्या आगय्या यासम हे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडांसह जुना विडी घरकुल येथे राहत होता. श्रीनिवासचे वडील उदरनिर्वाहसाठी ते घरगुती टेलरिंग काम करतात. श्रीनिवास हा अनेक वर्षांपासून दारू पीत होता. त्याचे लग्न झाले असून, त्याला लहान बाळ आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून श्रीनिवास हा दारूच्या व्यसनामुळे घरात नेहमी आई-वडिल व बायकोला मारहाण करत असे. तसेच वडीलांकडे वारंवार दारूसाठी पैसे मागून भांडण काढत असे.

वडिलांचे मुलावर सपासप वार

घटनेच्या दिवशी रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे श्रीनिवास यांनी वडील मल्लय्या यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. यावेळी वडिलांनी विरोध केला असता श्रीनिवास हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे चिडून जाऊन वडिलांनी किचनमधून चाकू आणला आणि मुलगा श्रीनिवास यांच्या गळ्यावर, डाव्या डोळ्याच्या खाली, उजव्या हाताच्या दंडावर व मानेवरील मागील बाजूस चाकूने सपासप वार केले. श्रीनिवास हा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला.

गर्भ पिशवीला टाके मारण्यासाठी आलेल्या महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, बुलढाण्यातील रुग्णालयात आक्रित घडलं

बेशुद्ध अवस्थेत भाऊ विनायक यांनी त्यास उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु गळ्यावर मोठी गंभीर जखम झाल्याने उपचारादरम्यान तो मयत झाला. या घटनेची नोंद व्हील पोलीस चौकीत झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद घेतली असून भा.द.वि 302 प्रमाणे मल्लय्या यासम(वय 70 वर्ष) यास अटक केली आहे. आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबत अधिकृत माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली.

तुम्ही काय शेतकऱ्यांचं वाटोळे करायला बसले आहात काय? आमदार संतोष बांगर यांनी महाबीज कर्मचाऱ्याला सुनावलं

Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *