बॉलीवूडची अभिनेत्री Aditi Rao Hydari पुन्हा एकदा नव्या लुकमध्ये नव्या स्टाईल आणि फॅशनसह दिसून आली आणि तिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने सर्वांचाच कलेजा खल्लास केला. यावेळी अदिती Cannes Film Festival 2023 च्या रेड कार्पेटवर दिसून आली. यावेळेचा तिचा लुक पाहणाऱ्या प्रत्येकासाठी थक्क करणारा ठरला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा अदितीने कान्सच्या 76 व्या सिझनमध्ये आपल्या सौंदर्याची मुक्त उधळण केली.

फ्रेंच रिव्हेरा टाऊनमध्ये पोहोचताच तिने आपला एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये सुंदर ब्ल्यू गाऊनमध्ये ती एखाद्या प्रिन्सेससारखी खूप सुंदर दिसत होती. अदितीच्या गॉर्जियस लुक्सवर चाहते तर फिदा झालेच पण तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड सिद्धार्थने सुद्धा तिच्या सौंदर्यावर घायाळ होऊन मनातली गोष्ट कमेंटद्वारे सर्वांदेखत व्यक्त केली. अदितीने या फोटोसोबत कॅप्शन शेअर केले होते की, “कान्स तुला पुन्हा एकदा भेटून मस्त वाटले.” (फोटोज साभार – इंस्टाग्राम @aditiraohydari)

अदितीचा जबरदस्त लुक

अदितीचा जबरदस्त लुक

अदिती राव हैदरीने कान्समधील तिच्या पहिल्या लूकसाठी डिस्ने प्रिन्सेसचा लुक निवडला होता. तिने फॅशन हाऊस ऑस्कर दे ला रेंटा मधून हा ग्लॅमरस हलका निळा गाऊन निवडला होता, जो परिधान करून ती फ्रेंच रिव्हिएराच्या रस्त्यावर फोटोशूट करताना दिसली होती. अदितीच्या या गाऊनचा पॅटर्न स्ट्रॅपलेस होता, ज्यामध्ये स्ट्रेट नेकलाईन दिसत होती.
(वाचा :- कंबरेवर सिल्हूट कट व फिगर स्किमिंग ड्रेसमधील सनी लिओनीला बघून चाहत्यांच्या जीवाची लाहीलाही,मिनिटात वातावरण गरम)​

फ्लोई गाऊनमध्ये प्रिन्सेससारखी दिसली अदिती

फ्लोई गाऊनमध्ये प्रिन्सेससारखी दिसली अदिती

आदितीच्या या गाऊनमध्ये न्यूड कॉर्सेट जोडण्यात आला होता, ज्यावर शिमरी डायमेंट्स दिसत होते. शिवाय, त्याच्यावर प्लीटेड फ्लोई गाऊन जोडला गेला होता, ज्याला कंबरेवर टाईट फिटिंग देण्यात आली होते. या कारणामुळे अदितीची फिगर या आउटफिटमध्ये उत्तम प्रकारे दिसली. गाऊनमध्ये बस्टच्या भागापासून कंबरेपर्यंत धनुष्यासारखी डिजाईन होती आणि स्कर्टचा भागाला व्हॉल्यूम देऊन फ्लोईसारखा ठेवण्यात आला होता.
(वाचा :- गडगंज श्रीमंत नताशा पुनावालाचे रिस्की कट, डीप गळा, बॅकलेस ब्रालेटमध्ये समुद्राच्या मध्यभागी श्वास रोखणारे फोटो)​

फ्लोर स्वीपिंग ट्रेन

फ्लोर स्वीपिंग ट्रेन

अदितीच्या गाऊनमधील फ्लोअर स्वीपिंग ट्रेनमुळे हे आऊटफिट रेड कार्पेटसाठी अगदी परफेक्ट ठरले. शिवाय समोरच्या बाजूस एसिमिट्रिकल पॅटर्नमध्ये हे ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये थाय हाय स्लीट डिजाईन होती. अदितीने तिचा प्रिन्सेस लूक पांढर्‍या स्ट्रेपी हिल्सने पूर्ण केला. अॅक्सेसरीजमध्ये नाजूक कानातले आणि स्टेटमेंट रिंग परिधान केल्या.
(वाचा :- भारतातील टॉप भालापटू नीरज चोप्राच्या बदललेल्या रूपावर लाखो मुली लट्टू, हरियाणाचा देसी बॉय असा झाला हॅंडसम हंक)​

सिद्धार्थ झाला अदितीच्या लुकवर लट्टू

सिद्धार्थ झाला अदितीच्या लुकवर लट्टू

मेकअपसाठी अदितीने न्यूड पिंक लिप शेड, शिमरी आयशॅडो, मस्कारा, डेवी बेस, बीमिंग हाईलाइटर, डिफाइन्ड आयब्रोजसोबत केसांना सेंटर पार्टेड करून व्हेव्समध्ये मोकळे सोडले होते. अदितीचा हा लूक इतका क्यूट दिसत होता की चाहतेही तिची प्रशंसा करताना थकले नाहीत. शिवाय तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड सिद्धार्थनेही कमेंट करत तिच्या लुकची स्तुती आणि इमोजीसचा वर्षावच केला.
(वाचा :- प्रियांका चोप्राने खांद्यापासून बिकिनी एरियापर्यंत कट व बॅकलेस होऊन दिल्या पोझ, चाहत्यांना 440 व्होल्टचा धक्का)​



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *