आदित्य ठाकरे बाळासाहेबांची खानदान होऊ शकत नाही:कालच्या पिल्लाला शिवसेना काय माहिती, शिंदे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
आदित्य ठाकरे ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही, अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. रामदास कदम यांनी खेडमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कालच्या आलेल्या पिल्लाला शिवसेना काय माहिती, असेही रामदास कदम म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असून मतदारसंघामध्ये दौरे करत आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे देखील मागे नाहीत. आदित्य ठाकरे मतदारसंघात भेटी देत असून पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला आम्ही एका कवडीची देखील किंमत देत नाही. शिवसेना आम्ही मोठी केली. शिवसेना कोकणी माणसाने मोठी केली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांनी काय योगदान दिले. कालच्या या पिल्लाला शिवसेना काय माहिती, अशा शब्दांत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. पुढे बोलताना, आदित्य ठाकरे हे बेईमान आहेत. ही बाळासाहेबांची खानदान होऊ शकत नाही. असे विधान रामदास कदम यांनी केले आहे. उद्धवने दापोलीतून निवडणूक लढवून दाखवावी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता आहे. राजकारणातून आमच्या खानदानाला उद्धवस्त करण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे करत होते. त्यांच्यात जर हिंमत असेल तर आदित्यच काय त्याच्या बापाने उद्धवने दापोली मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान देखील रामदास कदम यांनी दिले. ज्या सापाला दूध पाजले तो आता अंगावर येतोय नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर हाच उद्धव ठाकरे मला गाडीच्या पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मातोश्रीतून बाहेर निघत नव्हता. ज्या सापाला आम्ही दूध पाजले आता तोच आमच्या अंगावर येत आहे. पण त्याचा फणा कसा ठेचायचा हे आम्हाला चांगले माहिती आहे. त्यामुळे आपण कुणाच्या अंगावर जात आहोत याचे भान ठेवा, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.