आदित्य ठाकरेंचा दौरा राजकीय स्टंटबाजी:संजय शिरसाट यांचा दावा, पवारांनी ठाकरेंना संपवण्याचा कट आखल्याचा आरोप
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी बाबत पाहणी दौरा केला. मात्र त्यांचा हा दौरा म्हणजे केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांना शेतीतले काही कळत नसून केवळ एक दिवस यायचे आणि पाहून जायचे असा हा दौरा असल्याची टीका संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे केवळ एक राजकीय स्टंट होता.आदित्य यांना गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी याची कोणतीही माहिती नाही. केवळ दोन-चार गावात येऊन पाहणी करून फोटो काढून आम्ही शेतकरी यांच्या पाठीशी आहोत असे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना संपवण्याचा डाव यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना संपवण्याची योजना आखली आहे. सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका मांडली. त्यानंतर नाना पटोले यांनी देखील हीच भूमिका मांडली. पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पवारांनीच बोलायला लावले आणि त्याला मूक संमती दिली होती. आता पवार यांनी ज्यांचे जास्त जागा आमदार त्यांचा मुख्यमंत्री भूमिका मांडली आहे. पवार ठाकरे गटाला संपवण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. लाडकी बहिणी योजनेच्या श्रेय घेण्याच्या वादावरून महायुती मध्ये देखील कुठलाही वाद होऊ नये यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही शिरसाट यांनी यावेळी दिला.