Trending News: स्वप्नातील घर घेण्यासाठी आपण जीव तोडून मेहनत घेत असतो. गुंतवणूक आणि उत्तम प्लानिंग केल्यानंतर घराचं स्वप्न पूर्ण होते. मात्र, एका तरुणीने घर घेण्यासाठी एक सोप्पा मार्ग अवलंबला आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे राहणाऱ्या एमिलीनं घर घेण्यासाठी असा मार्ग निवडला आहे. जो ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

ब्रिटिश न्यूज वेबसाइट डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, एमिली अॅडल्ट कंटेट तयार करते. तसंच, अॅडल्ट वेबसाइटसाठीही ती काम करते. या मॉडेलनं अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, ती आधी करत असलेल्या कामामुळं तिला रोजचा खर्च भागवता येत नव्हता. तुटपुंज्या कमाईमधून ती कधीच स्वतःचं घर घेऊ शकत नव्हती. अशा परिस्थितीत कमी वेळेत पैसे कमवण्यासाठी तीने ९-५चा जॉब सोडून तीने अॅडल्ट इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली.

३२ वर्षांची एमिली आज अॅडल्ट मॉडल बनून महिन्याला लाखो रुपये कमवते. एमिलीला एक मुलगा असून ती पुन्हा गर्भवती आहे. एमिलीची वार्षिक कमाईचा आकडा पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. ती वर्षाला १ कोटी ७५ लाख कमवते. एमिलीनी अॅडल्ट इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबासह मित्र-मैत्रिणींसाठी धक्कादायक होता. एमिलीनं असा निर्णय का घेतला याबद्दलही तिने स्पष्ट केलं आहे.

वाचाः भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरले पालघर; पाच वर्षांपासून सातत्याने जाणवताहेत भूकंपाचे हादरे

सुरुवातीली एमिली भाड्याच्या घरात राहायची. त्यामुळं येता-जाता एमिलीला भाडे मालकाचे टोमणे ऐकावे लागत होते. त्यामुळं तिला लवकरात लवकरात स्वतःचे घर घ्यायचे होते. म्हणूनच तिने अॅडल्ट इंडस्ट्री जॉइन केली. आज ती बक्कळ पैसा कमवते. तसंच, तिचे स्वतःचे घर देखील आहे. मात्र, त्यासाठी तिला खूप मोठा त्याग करावा लागला आहे.

एमिलीच्या या निर्णयावर तिच्या कुटुंबातील सदस्य नाराज होते. त्यांनी तिला या क्षेत्रापासून लांब राहण्यास सांगितलं आहे. एमिली पारंपारिक आशिया कुटुंबातील आहे. त्यामुळं एमिलीच्या या निर्णयामुळं तिच्या संस्काराला धक्का बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, करोना महामारीच्या काळात लाखो लोकांचं आयुष्य बरबाद झालं होतं. अशावेळी तिची नोकरी टिकून राहिल की नाही याबाबत ती साशंक होती. अशात मुलांचं पालनपोषणाकडे तिला लक्ष देता आलं नसतं, असं ती म्हणते.

वाचाः जीव देण्यासाठी तरुणी रेल्वे रुळांवर आडवी पडली, मोटरमनच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *