अफगाणिस्तानचा २१ वर्षीय सलामीवीर त्याचं नाव रहमानुल्लाह गुरबाझ यंदा वर्ल्डकपच्या निमित्तानं भारतात आला. सध्या भारतात दिवाळीचं वातावरण असताना त्यानं अहमदाबादमधील बेघर नागरिकांप्रती दयाळूपणा दाखवत मदत केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या नागरिकांना गुरुबाझ त्यांच्या नकळत पैसे देत असल्याचं दिसून येतं. बेघर व्यक्तींची दिवाळी चांगली व्हावी म्हणून गुरबाझनं हे केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याची जोरदार चर्चा सुरु झाली.
Rahmanullah Gurbaz silently gave money to the needy people on the streets of Ahmedabad so they could celebrate Diwali.
– A beautiful gesture by Gurbaz. pic.twitter.com/6HY1TqjHg4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2023
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार गुरुबाझ मध्यरात्री ३ वाजता अहमदाबादच्या रस्त्यांच्या बाजूला फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या जवळ पैसे ठेवत होता, त्यांना मदत करत होता. गुरबाझनं या लोकांप्रती दाखवलेली करुणा आणि सहानुभूती चर्चेचा विषय ठरली आहे.
गुरुबाझनं अफगाणिस्तानच्या संघासाठी यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली. त्याचा साधीदार इब्राहिम झदरन याच्यासह त्यानं संघासाठी चांगली खेळी केली. गुरबाझनं ९ सामन्यांमध्ये संघासाठी ३१.११ च्या सरासरीनं २८० धावा केल्या.
अफगाणिस्तानच्या संघाचं बोलायचं झाल्यास त्यांनी यंदाच्या वर्ल्डकपमध्ये तीन गत विजेत्या संघांना पराभवाचं पाणी पाजलं. यामध्ये पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी नेदरलँडस् वर देखील विजय मिळवला.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवेश निश्चित
अफगाणिस्तान २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये चार विजयांसह ६ व्या स्थानावर असल्यानं आयसीसीच्या नियमानुसार २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत त्यांना प्रवेश मिळाला आहे. वर्ल्डकपमधील पहिल्या सात संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीत थेट प्रवेश मिळणार आहे. तर, पाकिस्तान या स्पर्धेचं संयोजन करणार आहे, अशी माहिती आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News