मुंबईः तब्बल ७० वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने त्यांना मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात नेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यातील तिघांना त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या विलगीकरण कक्षात सोडण्यात आले आहे. पण, भारतातून चित्ता नामशेष कसा झाला आणि देशातील शेवटच्या चित्त्याची शिकार कोणी केली हे जाणून घेऊया.

भारतात आता आणण्यात आलेल्या चित्त्यांमध्ये पाच मादी तर तीन नर आहेत. या चित्त्यांपैकी मादी या दोन ते पाच वयोगटातील आहेत तर नर हे साडेचार ते साडेपाच वर्षे वयोगटातील आहेत. मात्र अफ्रिकन चित्ते हे आशियाई चित्त्यांपेक्षा वेगळे आहेत. आफ्रिकेतील चित्ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेतील का, या विषयी शंका घेतली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातून चित्ते नामशेष का झाले याचा घेतलेला आढावा.

वाचाः महाराष्ट्रातही होता ‘आफ्रिकन चित्ता’; छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आणले होते चित्ते

एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतात चित्ते वास्तव्यास होते. त्यामुळे बहुतांश घराण्यांमध्ये चित्ते पाळले जात असत. अतिशिकारीसह अन्य कारणांमध्ये भारतातून चित्त्याची प्रजाती नष्ट झाली होती. मुघल काळापासून आपल्याकडील राजे-महाराजांनी चित्ते पाळण्याचा आणि नंतर त्यांच्याकडून शिकार करून घेण्याचा छंद जोपासला होता. यात प्रामुख्याने भारतीय चित्त्यांचा ताफा असे. मुघल शासक अकबरने त्याकाळी सुमारे १००० चित्यांचे संरक्षण केले होते आणि त्यांची संख्या त्याहूनही अधिक होती. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जर्नलमध्येही ही बाब समोर आली आहे.

भारतात अतिशिकार आणि अधिवासाच्या समस्येमुळं हळहळू चित्ता नामशेष होत गेला. १९५२मध्ये या प्राण्याला नामशेष घोषित करण्यात आले होते. १९४८मध्ये छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील सालच्या जंगलात शेवटचा मृत चित्ता आढळला होता. कोरियाचे राजा महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी देशातील शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार केली होती. त्यानंतरच चित्ता भारतातून नामशेष झाला. त्यानंतर भारत सरकारने १९५२मध्ये चित्ता नामशेष झाल्याचं घोषित केलं होतं. तेव्हापासून भारतात एकही चित्ता नाहीये. २००९मध्ये भारत सरकारने इतर देशातून चित्ते आणून त्याचं संधारण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाली. आज अफ्रिकेतून तब्बल ७० वर्षांतून चित्ते भारतात परत येत आहे.

वाचाः मोठी बातमी! त्र्यंबकेश्वराच्या पिंडीचा वज्रलेप निखळू लागला; शिवलिंगाची वेगाने झीज होण्याची भीती

महाराष्ट्रातही होता ‘आफ्रिकन चित्ता’

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आफ्रिकेतील चित्ते आणण्याचा प्रयोग केला होता. तब्बल चाळीस वर्षे या चित्त्यांची फौज कोल्हापूर संस्थानच्या राजाश्रयात सुखेनैव विहार करत होती. आफ्रिकन चित्त्यांचे आज (शनिवारी) भारतात आगमन होत असताना कोल्हापूरमध्ये भवानीशंकर, लक्ष्मी, गणप्या, वीरमती या चित्त्यांची राज्य गाजवले होते. महाराजांकडे १९३६ च्या सुमारास ३५ चित्ते असल्याच्या नोंदी आढळतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.