नागपूर: बलात्कार केल्यानंतर धारदार शस्त्रांनी गळा चिरुन महिलेची हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गालगतच्या वडगाव गुजर परिसरात उघडकीस आली. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.
महिला ट्रेनमधून उतरली; एकटीच घरी निघाली, फोनवर बोलत असल्याने गाफील राहिली अन् नको ते घडून बसलं
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री एकपेक्षा अधिक मारेकरी कार अथवा अन्य वाहनाने महिलेला घेऊन वडगाव गुजर परिसरात निर्जनस्थळी आले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. शस्त्राने गळा चिरुन तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह सुमारे १०० मीटर अंतरावर फेकून मारेकरी पसार झाले. मंगळवारी दुपारी एक नागरिक परिसरातून पायी जात होता. त्याला रस्तावर रक्त पडलेले दिसले. भीतीमुळे त्याने कोणाला सांगितले नाही. दुपारी हिम्मत करून त्याने गावातील दोघांना माहिती दिली. एका ग्रामस्थाने हिंगणा पोलिसांना कळविले.

आमच्यातील वाद मिटला, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर रामदास कदमांची प्रतिक्रिया

माहिती मिळताच हिंगणा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पाहणी केली असता महिलेचा गळा धारदार शस्त्राने चिरला होता. मृतदेहापासून काही अंतरावर महिलेचे कानातले आणि चप्पल पडली होती. तसेच या परिसरात पोलिसांना आक्षेपार्ह वस्तूही आढळल्या. त्यामुळे बलात्कार केल्यानंतर महिलेचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारेही पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *