[ad_1]

मुंबई : विराट कोहलीने यावेळी सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा महाविक्रम मोडीत काढला. शतक झळकावल्यावर कोहलीने फक्त बॅट उंचावली नाही तर तो मैदानात आपल्या गुडघ्यांवर बसला. त्यानंतर त्याने आपले हेल्मेट काढले. त्यानंतर कोहली उभा राहीला आणि त्याने सचिनला कुर्निसात केला. सचिन त्यावेळी मैदानातच उपस्थित होता. त्यावेळी सचिनने जी कोहलीला प्रतिक्रीया दिली ती यावेळी सर्वात महत्वाची ठरली.विराट कोहलीने यावेळी सचिनचे दोन वर्ल्ड रेकॉर्ड यावेळी मोडीत काढले. आतापर्यंतच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा सचिनच्या नावावर होता. तो विश्वविक्रम कोहलीने यावेळी मोडीत काढला. त्याचबरोबर सचिनचा वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा वर्ल्ड रेकॉर्डही यावेळी कोहलीने मोडीत काढला. कारण कोहलीचे हे वनडे क्रिकेटमधील ५० वे शतक ठरले. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतके झळकावली होती. पण कोहलीने आपले पन्नासावे शतक करत सचिननचा हा वर्ल्ड रेकॉर्डही मोडला. कोहलीने जेव्हा हा मोठा विक्रम मोडीत काढला तेव्हा सचिनने भन्नाट प्रतिक्रीया दिली. कोहलीचे शतक झाले आणि त्याने सचिनना आपल्या खास शैलीत नमस्कार केला. त्यावेळी सचिन हे सर्व पाहत होता. कोहलीचे शतक झाल्याव सचिन आपल्या जागेवरून उठला आणि त्याने दोन्ही हात उंचावत कोहलीचे अभिवादन स्विकारले. दोन्ही हातांनी सचिनने टाळ्या वाजवल्या आणि त्यानंतर सचिनने दोन्ही हाताने थम्प अपची खूणही कोहलीला केली. या वर्ल्ड कपमध्ये कोहली भन्नाट फॉर्मात आहे. कारण या वर्ल्ड कपमध्ये ५५० धाव करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. कोहलीने यावेळी वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासूनच दमदार फलंदाजीला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच सामन्यात जेव्हा रोहित शर्मा शून्यावर बाद झाला होता, त्यानंतर कोहलीने भारताचा डाव सावरला होता. कोहली त्यावेळी मैदानात ठामपणे उभा राहीला होता आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर कोहली हा सातत्याने धावा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज न्यूझीलंडच्या सेमी फायनलमध्ये भारताला रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. पण त्यानंतर कोहली फलंदाजीला आला आणि त्याने भारताची धावगती वाढवली. कोहलीने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि त्याने आपले शतक झळकावले. कोहलीने यावेळी सचिनचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये कोहली कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *