अहमदाबाद: विश्वचषकातील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला प्रोत्साहन दिले. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्याने एक एक करून सर्व खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीवर थाप दिली. यावेळी त्यांनी आपल्या उत्साही शब्दांनी संघाचे खालावलेले मनोबल उंचावण्याचा प्रयत्नही केला. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर पीएम मोदींनी सर्वप्रथम रोहित शर्मा आणि विराट कोहलीची भेट घेतली. त्यानंतर राहुल द्रविडकडून. त्यानंतर जडेजा, शमी आणि त्यानंतर सर्वच खेळाडूंसह. इतकेच नाही तर खेळाडूंची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिल्यानंतर पंतप्रधानांनी टीम इंडियाला दिल्लीत येण्याचे निमंत्रणही दिले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय रूममध्ये जाऊन त्यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आणि, अशा प्रकारे टीम इंडियाच्या तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या आकांक्षा धुळीला मिळाल्या.

तुम्ही सर्व १० सामने जिंकून आला आहात, हे होतच असते. हसा मुलांनो देश तुम्हाला पाहत आहे. खास विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही खेळाडूंचा हात धरून ते दोघांचे सांत्वन करत होते. रवींद्र जडेजाला आवाज देत क्या बाबू असे म्हणत त्याची भेट घेतली. मोहम्मद शमीची भेट घेत त्याला जवळ घेतले आणि त्याने चांगली कामगिरी केल्याची त्याला संगितले.

पुढे सर्वांची भेट घेतल्यांनंतर मोदी म्हणाले, ” तुम्ही सर्वजण खूप मेहनत घेत आहात. चला, हे तर सगळं होतंच असतं आणि दोस्तानो एकमेकांना प्रोत्साहन देत चला जेव्हा तुम्ही थोडे फ्री असाल, मोकळे व्हाल आणि तुम्ही दिल्लीला याल, तुमच्या सर्वांसोबत थोडा वेळ घालवेन मी, तुम्हा सर्वांना माझ्या कडून आमंत्रित करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *