ऑकलंड : भारताला पहिल्या वनडे सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात मात्र भारतीय संघात मोठे बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत आता समोर आले आहेत.
पहिला बदल…
भारतीय संघाने हा सामना गमावला तो गोलंदाजीमुळे. या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली ती एक ओव्हर. शार्दुलच्या ३९व्या षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तब्बल चार चौकार आणि एका षटकारासह २५ धावांची लूट केली. या शार्दुलच्या एका षटकातील २५ धावांमुळे सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला आणि हाच या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात शार्दुलला संघाबाहेर केले जाऊ शकते.

दुसरा बदल….
दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात दुसरा बदल हा गोलंदाजीमध्येच होऊ शकतो. पहिल्या सामन्यासाठी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यामध्ये स्पर्धा होती, पण यावेळी चहलला संधी देण्यात आली. पण पहिल्या सामन्यात चहलने १० षटकांत ६७ धावा दिल्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी चहलला संघाबाहेर करून कुलदीपला संघात स्थान दिले जाऊ शकते.

तिसरा बदल
दुसऱ्या वनडेसाठी फलंदाजीमध्ये एक मोठा बदल केला जाऊ शकतो. कारण आतापर्यंत रिषभ पंतला सर्वात जास्त संधी दिल्या आहेत. पण पंत हा सातत्याने फ्लॉप ठरत आहे. त्याचबरोबर पंतचा फिटनेस हा देखील एक वादाचा मुद्दा ठरू शकतो. पहिल्या वनडेमध्ये पंत आणि संजून सॅमसन या दोघांनाही संधी दिल्या होत्या. पण या सामन्यात पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यात पंतला वगळले जाऊ शकते.

चौथा बदल…
भारतीय संघात दुसऱ्या वनडेसाठी चौथा बदल हा गोलंदाजीमध्येच होऊ शकतो. दुसऱ्या वनडेसाठी भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगलाही विश्रांती दिली जाऊ शकते. कारण टी-२० विश्वचषक, न्यूझीलंडमधील टी-२० मालिका आणि आता वनडे मालिकेतही तो खेळत आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा विचार यावेळी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात ८.१ षटकांत ६८ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यासाठी हा चौथा बदल भारतीय संघात केला जाऊ शकतो. भारताला दुसरा वनडे सामना जिंकावा लागणार आहे. जर त्यांचा पराभव झाला तर त्यांना ही मालिका गमवावी लागेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *