नवी दिल्ली : यलो मॉन्स्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने रविवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला. नाणेफेक हरल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य ४३ षटकांत ६ गडी गमावून पूर्ण केले.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमन हिनेही ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजय साजरा केला. मात्र, काही भारतीय चाहत्यांना विनीने आनंदी राहणे किंवा असे सेलिब्रेशन करणे पसंत केले नाही, त्यामुळे त्यांनी मॅक्सवेलच्या पत्नीवर टीका करणे आणि तिला ट्रोल करणे सुरू केले. या सगळ्यावर आता विनी रमण हिने प्रतिक्रिया दिली आहे.

विनी रमणने ट्रोलर्स दिले ताबडतोड उत्तर

ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमन मूळची भारतीय आहे. पण तिचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला. ती भारतीय वंशाची असल्याने काही भारतीय चाहत्यांना तिचे असे सेलिब्रेट करणे कठीण जात आहे. आता विनी रमणने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. विनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून स्टोरी पोस्ट करत त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

ग्लेन मॅक्सवेलच्या पत्नीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, ‘माझा विश्वासच बसत नाही की मला हे लिहावे लागेल. पण भारतीय असलात तरी तुम्ही तुमचा जन्म जिथे झाला, जिथे तुम्ही लहानाचे मोठे झालात त्या देशाचे समर्थन करू शकता. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमचा नवरा आणि मुलाचे वडील ज्या संघात खेळतात त्या संघाला पाठिंबा देऊच शकतो. तुमच्यात भरलेल्या या द्वेषाचा उपयोग इतर महत्त्वाच्या मुद्द्यासाठी करा.

Vini Raman Instagram STory.

ग्लेन मॅक्सवेलने गेल्या वर्षी म्हणजेच १८ मार्च २०२२ रोजी विनी रमनशी लग्न केले. तो अनेक काळापासून विनी रमनला डेट करत होता. जेव्हा नवविवाहित मॅक्सवेल आयपीएल खेळायला आला होता. तर इथेही त्याच्या लग्नाची पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा समावेश होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *