जालना : यांनी धाईत नगर अंबड तालुका जालना जिल्हा येथे ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत आमचा मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा आरक्षण कायदा मांडला होता त्यावेळी पाठिंबा दिला होता. सुप्रीम कोर्टात का अडकलं त्याचा अभ्यास करुन मार्ग काढा, असं भुजबळ म्हणाले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका मांडली. जरांगे फक्त लेकरं लेकरं करतात अरे आमची पण लेकरं आहेत, असं भुजबळ म्हणाले. अंतरवाली सराटीमध्ये १ सप्टेंबरला नेमकं काय घडलं होतं, याबाबत माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली. यांच्या उपोषणावेळी पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला आहे. महिला पोलिसांसह ७० पोलीस रुग्णालयात जखमी झाले होते. पोलीस त्यांना उठवायला गेले होते, ते म्हणाले मी झोपलोय नंतर माघारी या. एवढ्या कालावधीत त्यांनी तयारी करुन ठेवली होती. मनोज जरांगे यांना रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती करणाऱ्या पोलिसांवर दगडांचा मारा झाला. ७० पोलीस पाय घसरुन पडले का त्यांना कोणी मारलं? पाय घसरुन पडले का?, रुग्णालयात रेकॉर्ड आहे. राज्यात महिला आयोग आहे, रुपाली चाकणकर आणि निलमताई गोऱ्हे यांना आम्ही महिला पोलिसांचे पत्ते द्यायला तयार आहोत, असं छगन भुजबळ म्हणाले. पोलिसांची बाजू समोर आली नाही. एकज बाजू समोर आली आंदोलकांवर हल्ला झाला. पोलिसांवर हल्ला झाला, महिलांवर हल्ला झाला त्यांनी काय करायला पाहिजे. लष्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हारा है, तुम झुठ को सच लिख दो है ही शायरी म्हणत छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीत त्या दिवशी काय घडलं ते सांगितलं. लाठीचार्ज झाल्यानंतर शूर सरदार घरात जाऊन झोपले होते. आमचे अंबडचे मित्र राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी घरातून रात्री तीन वाजता आणलं आणि पवार साहेब येणार आहेत, असं सांगितलं. शरद पवार पण आले पण लाठीचार्ज का झाला हे त्यांना सांगितलं नव्हतं, असं छगन भुजबळ म्हणाले. या घटनेत अनेकांची चूक झाली, दोशी नावाचे एसपी आहेत त्यांनी माझे पोलीस जखमी झाले असताना काय करु शकतो, हे सांगायला हवं होतं. देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांच्या पोलिसांसोबत काय घडलं ते सांगायला पाहिजे होते. मात्र उलटं घडलं, पोलीस निलंबित झाले, गृहमंत्र्यांनी माफी मागितली. या सगळ्यामुळं पोलीस पण विचार करायला लागले, असं छगन भुजबळ म्हणाले. Read Latest AndSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *