अजिंठा महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात:दिव्य मराठीच्या बातमीनंतर प्रशासनला आली जाग
जळगाव ते अजिंठा- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सर्वच पुलांवर खड्डे पडले, डांबर निघून गेल्यामुळे अपघातांची मालीका सुरू होती. दिव्य मराठीने याविषयावर आवाज उठवल्यानंतर महामार्गावरील अनेक गावातील लोकांनी देखील रस्ता दुरूस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्य मराठीच्या वृत्ताची दखल घेवून महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदाराकडून तातडीने पुलावरील खड्डे बुजवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. जळगाव उर्वरित पान ४ रस्ता आणि पुल यातील तीन ते चार इंचाचा गॅप, डांबरीकरण निघून गेल्याने पडलेले खड्डे यामुळे संपुर्ण रस्त्यावर पुलांच्या ठिकाणी दररोज अपघातांची मालीका सुरू होती. आता खड्डे बुजवण्यात येत असल्याने या ठिकाणी अपघात टळणार आहेत. नेरी गाव, पहूर, पाळधी, गाडेगाव या ठिकाणी गावातील पुलांवर केली जाणारी दुरुस्ती ही चांगल्या दर्जाची असावी. तसेच महामार्गावर वाहतुक वाढल्यामुळे खड्डे पडणाऱ्या ठिकाणांचे सर्व्हेक्षण करून दुरुस्ती सुरूच ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.