जालना: शहरातील नूतन वसाहत परिसरात जांगडे पेट्रेलपंपासमोर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या घटनेचे पर्यवसान मोटरसायकलस्वारांच्या बाचाबाचीत झाले. हा प्रकार सुरू असतानाच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. काही समजूतदार व्यक्तींनी परिसरातील व्यावसायिकांनी तिथे धाव घेऊन भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टर दापत्याचे स्वप्न अधुरेच! थोड्या वेळात येतो सांगितले; अन् मुलगा बाहेर गेला, नंतर जे घडलं त्यानं…
दिवाळीचा सण आणि त्यातच व्यावसायिकांच्या ग्राहकांची वेळ असल्याने परिसरात ऊगीच अशांतता होऊ नये, म्हणून काही नागरिक भांडणे सोडवण्यासाठी गेले. परंतु वातावरण शांत होण्याऐवजी दोन गट एकमेकांसमोर भिडल्याने फ्री स्टाईल मारामारी झाली. यामध्ये एक जणाच्या हातावर हत्याराने वार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या राड्यामध्ये दोन ते तीन जण जखमी झाले असून जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जमावाने दुकानाची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी, मुख्यमंत्र्यांची नाश्त्यासाठी मामलेदार मिसळीला पसंती, बीलही स्वत भरलं!

घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पोलिसांनी तात्काळ जमावास पांगविले. पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधीकारी सचिन सांगळे,स्थानिक गुन्हे शाखेचे पो.निरि.रामेश्वर खनाळ, तालुका पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, चंदनझीरा पोलीस ठाणे आणि कदीम जालना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ऐन दिवाळी सणामध्ये दोन गटात राडा झाल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावारण निर्माण झाले असून सध्या परिसरामध्ये तणावपुर्वक शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेतले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *