अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार:पुणे पोलिस आयुक्तालयापुढे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांचे आंदोलन

अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार:पुणे पोलिस आयुक्तालयापुढे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांचे आंदोलन

काेरेगाव पार्क येथे एका अल्पवयीन मुलीवर ड्रग्ज पार्टीत अल्पवयीन मुलांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अकरावी-बारावीच्या मुलांना ड्रग्ज काेठून सहज उपलब्ध हाेतात? ही बाब चिंताजनक असल्याचे सांगत महिला सुरक्षितताकडे लक्ष्य वेधण्यासाठी काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शुक्रवारी पुणे पाेलिस आयुक्तलयापुढे ठिय्या आंदाेलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे उपस्थित हाेते. यावेळी सदर श्रेष्ठ मंडळांनी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याशी चर्चा करून गुन्ह्याची माहिती घेतली. यावेळी रविंद्र धंगेकर म्हणाले, पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. पण येथे सहजपणे अंमली पदार्थ मिळत आहेत. काेरेगाव पार्क येथे एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन आराेपींसह सज्ञान आराेपींनी मिळून लैंगिक अत्याचार केला आहे. संस्थाचालक हा प्रकार त्यांच्या आवारात घडून देखील दडपण्याचा प्रयत्न करत आहे. संशयाची सुई काेणाला वाचविण्यापर्यंत जात आहे. एका पाेलिस हवालदार महिलेने हे प्रकरण समाेर आणले आहे. या घटनेत आरोपींनी ड्रग्ज वापरले की नाही हा पाेलिस तपासाचा भाग आहे. पण मुले ड्र्ग्ज घेत असतील तर ते ड्रग काेण विकत आहे हे शाेधण्याची गरज आहे. ज्या मुलीवर अत्याचार झाला, तिला शाळेतून काढण्यासाठी दमदाटी करुन दाखला देण्यात आला आहे. मुलीस संरक्षण देता येत नसेल तर संस्थाचालक, शिक्षक यांनी याबाबत पाेलिस ठाण्यात तक्रार करण्याची गरज होती. परंतु त्यांनीच दडपण टाकून हे प्रकरण दबण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुणे शहर बदनाम हाेत असून अन्याय दडपणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. चुकीची लाेकं संस्थेत काम करत असून याबाबतचा पाठपुरावा आगामी काळात देखील आम्ही करणार आहोत, असेही रविंद्र धंगेकर यावेळी बोलताना म्हणाले.

​काेरेगाव पार्क येथे एका अल्पवयीन मुलीवर ड्रग्ज पार्टीत अल्पवयीन मुलांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अकरावी-बारावीच्या मुलांना ड्रग्ज काेठून सहज उपलब्ध हाेतात? ही बाब चिंताजनक असल्याचे सांगत महिला सुरक्षितताकडे लक्ष्य वेधण्यासाठी काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शुक्रवारी पुणे पाेलिस आयुक्तलयापुढे ठिय्या आंदाेलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे उपस्थित हाेते. यावेळी सदर श्रेष्ठ मंडळांनी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याशी चर्चा करून गुन्ह्याची माहिती घेतली. यावेळी रविंद्र धंगेकर म्हणाले, पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. पण येथे सहजपणे अंमली पदार्थ मिळत आहेत. काेरेगाव पार्क येथे एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन आराेपींसह सज्ञान आराेपींनी मिळून लैंगिक अत्याचार केला आहे. संस्थाचालक हा प्रकार त्यांच्या आवारात घडून देखील दडपण्याचा प्रयत्न करत आहे. संशयाची सुई काेणाला वाचविण्यापर्यंत जात आहे. एका पाेलिस हवालदार महिलेने हे प्रकरण समाेर आणले आहे. या घटनेत आरोपींनी ड्रग्ज वापरले की नाही हा पाेलिस तपासाचा भाग आहे. पण मुले ड्र्ग्ज घेत असतील तर ते ड्रग काेण विकत आहे हे शाेधण्याची गरज आहे. ज्या मुलीवर अत्याचार झाला, तिला शाळेतून काढण्यासाठी दमदाटी करुन दाखला देण्यात आला आहे. मुलीस संरक्षण देता येत नसेल तर संस्थाचालक, शिक्षक यांनी याबाबत पाेलिस ठाण्यात तक्रार करण्याची गरज होती. परंतु त्यांनीच दडपण टाकून हे प्रकरण दबण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुणे शहर बदनाम हाेत असून अन्याय दडपणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. चुकीची लाेकं संस्थेत काम करत असून याबाबतचा पाठपुरावा आगामी काळात देखील आम्ही करणार आहोत, असेही रविंद्र धंगेकर यावेळी बोलताना म्हणाले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment