नवी दिल्लीःAirtel 999 Plan update : देशाची दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी एअरटेल (Airtel) ने आपल्या काही प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे. आतापर्यंत एअरटेलने प्रीपेड प्लान्ससाठी टॅरिफ वाढ केली होती. परंतु, आता पोस्टपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, काही आठवड्याआधी एअरटेलने एक नवीन प्लान आणला आहे. आता जास्त किंमत जुन्या प्लानच्या बेनिफिटसोबत येतो. एअरटेलकडून ९९९ रुपयाच्या प्लानला नवीन लाँच करण्यात आले आहे. या प्लानसाठी आता ११९९ रुपये मोजावे लागणार आहेत. जाणून घ्या या प्लान्स संबंधी.

Airtel 1199 रुपयाच्या प्लानचे फायदे
एअरटेल यूजर्सला 200GB पर्यंत रोलओव्हर सोबत प्रत्येक अॅड ऑन कनेक्शनसाठी 150GB महिन्याला डेटा प्लस + 30GB अॅड ऑन डेटा देते. यूजर्स या प्लानमध्ये कुटुंबाच्या सदस्यांसाठी फ्री अॅड ऑन व्हाइस कनेक्शन मिळू शकते. या प्लान सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएसचा समावेश आहे. एअरटेल थँक्स प्लॅटिना रिवार्ड्स जे यूजर्सला या प्लान सोबत मिळते. यात नेटफ्लिक्स बेसिक मंथली सब्सक्रिप्शन, विना कोणत्याही अतिरिक्त पैशाशिवाय, सहा महिन्यासाठी अमेझॉन प्राइमचे सदस्य, डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइल प्लान, विंक प्रीमियमचे सब्सक्रिप्शनचा समावेश आहे.

वाचा: २० जूनला येतोय Realme C30 स्मार्टफोन, किंमत ७ हजारांपर्यंत, फीचर्स मिळतील जबरदस्त

Airtel 999 रुपयाचा पोस्टपेड प्लान
जर तुम्ही भारती एअरटेलचा १९९ रुपयाचा पोस्टपेड प्लान घेत असाल तर तुम्हाला यात प्लानमध्ये 100GB डेटा (प्रत्येक ऐड-ऑन कनेक्शन साठी 30GB देता), 200GB पर्यंत रोलओवर सोबत 100GB मासिक डेटा, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग, आणि 100 एसएमएस मिळतात. हा प्लान एअरटेल थँक्स प्लॅटिना बेनिफिक्ट्स सोबत सुद्धा येतो. या प्लान सोबत एकूण दोन अॅड ऑन कनेक्शन सुद्धा मिळू शकते.

वाचाः Google Drive सह ‘या’ सेवा न वापरण्याचे सरकारचे कर्मचाऱ्यांना आदेश, पाहा डिटेल्स

वाचाः Google Pay वरून पैसे पाठवण्याची लिमिट संपली? ‘या’ पद्धतीने करता येईल आर्थिक व्यवहारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.