नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेलचे (Airtel) अनेक भागांमध्ये नेटवर्क ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. एअरटेलच्या यूजर्सला नेटवर्क डाउनलोड झाल्याची समस्या येत होती. ८ जूनला सायंकाळी काही वेळासाठी एअरटेलचे नेटवर्क डाउन झाले होते. नेटवर्क डाउनलोड झाल्याने यूजर्सला इंटरनेट वापरताना देखील समस्या येत होती. Airtel चे नेटवर्क डाउन झाल्यानंतर अनेक यूजर्सने सोशल मीडियावर देखील तक्रार केली आहे. अनेक यूजर्सनी त्यांना इंटरनेट वापरता येत नसल्याची तक्रार केली. नेटवर्क ठप्प झाल्याने यूजर्सला कॉल देखील करता येत नव्हते.

वाचा: Recharge Plans: वारंवार रिचार्जची गरजच नाही! वर्षभराच्या व्हॅलिडिटीसह येणारे ‘हे’ आहेत स्वस्तात मस्त प्रीपेड प्लान्स; पाहा लिस्ट

डाउनडेक्टर डॉट कॉमनुसार, सायंकाळी ४ नंतर एअरटेल यूजर्सला नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागला. काही वेळातच वेबसाइटवर साडेतीन हजारांपेक्षा अधिक यूजर्सच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, नेटवर्क डाउनचा सामना सर्वच यूजर्सला करावा लागला नाही. काही ठराविक ठिकाणी एअरटेलचे नेटवर्क डाउन झाले होते. एअरटेलने दावा केला की, सर्विस अवघ्या १५ मिनिटातच पुन्हा सुरू झाली. नेटवर्क डाउन झाल्याने यूजर्सने मायक्रो ब्लॉगिंग साइट Twitter वर कंपनीविरोधात राग व्यक्त केला. यानंतर सोशल मीडियावर #AirtelDown टॉप ट्रेडिंग करत होते.

एअरटेलचे नेटवर्क डाउन झाल्यानंतर अनेकांनी ट्विटरवर मजेशीर मिम्स देखील शेअर केले.

दरम्यान, एअरटेलचे नेटवर्क ठराविक ठिकाणीच डाउन झाले होते. मुंबई, दिल्ली, जयपूर, हैद्राबाद, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकत्ता या शहरातील यूजर्सला याचा फटका बसला. नेटवर्क नसल्याने यूजर्सला कस्टमर केअरशी देखील संपर्क करता येत नव्हता. तसेच, कंपनीने काही मिनिटातच पुन्हा सेवा सुरू झाल्याचा दावा केला आहे.

वाचा: Upcoming Smartphone: कन्फर्म! ‘या’ तारखेला येतोय Nothing चा पहिला वहिला ट्रान्सपेरेंट फोन, आयफोनला देणार टक्कर

वाचा: Smartphone Offers: भन्नाट ऑफर! ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारा सॅमसंगचा बेस्टसेलर फोन मिळतोय फक्त १० हजारात, पाहा डिटेल्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.