अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे शरद पवारांचा सत्कार:राज्याच्या सर्वच माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव; ठाकरे – शिंदे एका व्यासपीठावर येणार का?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे शरद पवारांचा सत्कार:राज्याच्या सर्वच माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव; ठाकरे – शिंदे एका व्यासपीठावर येणार का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातल्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये सर्वात अग्रस्थानी शरद पवार यांचे नाव आहे. अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन वेगवेगळे पक्ष झाल्यानंतर हे दोन्ही नेते अनेक कार्यक्रमात एकत्र आलेले दिसून आले आहेत. मात्र आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असून त्याला शरद पवार हजेरी लावणार का? अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांना पायउतार होण्यासाठी भाग पाडणारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार होणार आहे. त्यातच अजित पवार यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार हे अनेक कार्यक्रमात एकत्र दिसून आलेले आहेत. मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे अद्याप एका व्यासपीठावर आलेले नाहीत. त्यामुळे आता या कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एका व्यासपीठावर येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याआधी देखील अनेकदा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची समोरासमोर भेट झाली होती. मात्र त्यांच्यामध्ये कोणताच संवाद झालेला दिसून आला नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मात्र संवाद झालेला अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याची उत्सुकता सर्वांमध्येच दिसून येत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment