अजित पवारांनी ‘लाडकी बहिणी’चे श्रेय घेतले:कॅबिनेटमध्ये खडाजंगी, फडणवीस यांची SOP आणण्याची तयारी; महायुतीमधील वाद समोर
राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या श्रेय वादावरून महायुती मध्ये चांगलेच वाक् युद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एकमेकांविरोधात तक्रार करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचे श्रेय एकटेच घेत आहेत, असा आरोप इतर पक्षातील मंत्र्यांनी केला आहे. त्यावर आपण लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एसओपी आणू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना शांत केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून या योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या जनसमान यात्रेनिमित्त लाडकी बहिणी योजनेचे श्रेय ते घेताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी बॅनर, पोस्टर आणि जाहिरातीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा प्रचार अजित पवार यांच्यामार्फत होत आहे. मात्र यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश करण्यात येत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील मंत्री नाराज होत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यातच आता मंत्रिमंडळ बैठकीत देखील या मुद्द्यावरून मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे देखील स्पष्टीकरण अजित पवार यांची जनन्समान यात्रा हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम आहे. त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या जाहिराती आणि बॅनरवर केवळ अजित पवार यांचे फोटो असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील किंवा इतर लोकांनी आक्षेप घ्यावा, असे वाटण्याचे काहीही कारण नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी म्हटले आहे. ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी अनाथांचा नाथ म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे होर्डिंग लागले होते. म्हणजेच ते होल्डिंग लावण्याची तयारी देखील आधीच झाली होती. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकट्याने श्रेय का घ्यावे? असे म्हणालो नव्हतो, असे देखील उमेश पाटील यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. शरद पवार यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी निर्णय बदलला:त्यांना काँग्रेसची साथ सोडण्याचे सांगितले होते; कदम यांचा मोठा दावा एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आमदार गुवाहाटी येथे गेले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची साथ सोडावी, सर्व आमदारांना दोन तासात परत आणतो, असा शब्द मी त्यांना दिला होता. उद्धव ठाकरेंचा तसा विचार देखील झाला होता. मात्र, शरद पवार यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी निर्णय बदलला. आणि आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे सांगितले. असा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. दापोली मध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्ण बातमी वाचा… दिशाभूल केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल:संभाजीनगर मधील युवकाची शासनाची बदनामी केल्याची तक्रार शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मयत शेतकऱ्यांचे वारस, नातेवाईक, शेतकरी, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या गोरगरीब महिला, यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून नैराश येईल आणि त्यांनी शासनाविरोध उठाव करावा, तसेच शासनाविरोधात खोटे आंदोलन उभे राहावे, यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या पोस्टवरून त्यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…. लोअर परळ परिसरातील कमला मिल टाईम्स टॉवरला भीषण आग:अनधिकृत बांधकामांमुळे अशा घटना घडत असल्याचा मनसेचा आरोप उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल टाईम्स टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. सकाळी साडेसहा वाजता टाईम्स टॉवरला आग लागल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्ण बातमी वाचा…