अजित पवारांचे नाव घेताच महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली:गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा निशाणा

अजित पवारांचे नाव घेताच महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली:गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा निशाणा

संतोष देशमुख हत्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेतले आहे. ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा प्रश्न त्यांनी परभणीमधील मोर्चात उपस्थित केला होता. सुरेश धस यांच्या या प्रश्नाला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील प्रत्युत्तर दिले आहे. सुरेश धस यांचा गृह मंत्रालयावर विश्वास नाही का? असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणातील आरोपी स्वतः आत्मसर्पण करत आहेत. मग गृह विभाग झोपा काढत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना आवरावे. ते महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप देखील सुरज चव्हाण यांनी केला आहे. विनाकारण अजित पवार यांना बदनाम करण्याचे काम केले तर जशास तसे उत्तर देणार असल्याचे देखील सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे. सुरज चव्हाण यांनी केलेली पोस्ट देखील वाचा…. स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ. सुरेश अण्णा धस जाणीव पूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या सभेत अजित दादांना क्या हुआ तेरा वादा …म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णा ला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत मग गृह खातं झोपा काढत आहे का ? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? स्व. संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता, कार्यकर्ता जर चौकशीत दोषी आढळला तर अजित दादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गय करणार नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे आ. सुरेश अण्णा धस यांना आवरावे. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याच काम ते करत आहेत. विनाकारण अजितदादांना या प्रकरणात बदमान करण्याचं काम केलं तर जशास तस उत्तर आम्ही देऊ. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. पोलिस अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील?:जितेंद्र आव्हाड यांचा सवाल; SIT मधील सदस्यांवर प्रश्नचिन्ह बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारच्या वतीने चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या SIT मध्ये एक प्रमुख आयपीएस अधिकारी हा बाहेरील असून उर्वरित सर्व अधिकारी हे वाल्मीक कराडची माणसे असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अशा वेळी हे अधिकारी वाल्मीक कराडला शिक्षा देतील की मदत करतील? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. पूर्ण बातमी वाचा… मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, हा निवडणुकीचा ‘जुमला’ होता का?:संजय राऊत यांचा सवाल; अध्यादेश निघाला नसल्याचा आरोप विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही मराठी भाषेचे कसे तारक आहोत, याचे ढोल वाजवले गेले. मात्र मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भोषेचा दर्जा देण्यासंदर्भातला अध्यादेश काढला नाही. तर महाराष्ट्र सरकार देखील त्या संदर्भात पाठपुरावा करताना दिसत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा… पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम:उत्तरेकडील शीतलहरींमुळे संभाजीनगर 11.6 अंशांवर उत्तरेकडील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात तो अधिक जाणवत असून पुढील दोन दिवस तो कायम राहण्याची शक्यता आहे. धुळे येथे शनिवारी राज्यातील नीचांकी 6.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिकचे तापमान 10.1 तर छत्रपती संभाजीनगरचे 11.6 अंशांवर होते. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवर्षाव होत आहे. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आगामी दोन दिवस दाट धुके राहणार असून तेथील वातावरणाचा परिणाम राज्यावर होत आहे. दोन दिवसांनंतर काहीशी थंडी कमी होणार असल्याचे सांगण्यात आले. पूर्ण बातमी वाचा….

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment