अजित पवारांच्या पक्षाला धक्का लागणार?:राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिलेले राजन पाटील शरद पवारांच्या भेटीला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे राजन पाटील यांना अजित पवारांनी सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. राजन पाटील शरद पवार यांची भेट घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर गेले आहेत. शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांना भेटण्यात गैर काय? असा प्रश्न राजन पाटील यांनी उपस्थित केला आहे. जरी मला अजित पवारांनी महामंडळाचे अध्यक्ष केले असले तरी शरद पवार हे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीला आलो आहे, असे राजन पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी राजन पाटील यांच्या मोहोळमध्ये सभा घेतली होती. तसेच राजन पाटील यांना विरोध करणाऱ्या उमेश पाटील यांना अजित पवारांनी यावेळी चांगलेच खडेबोल देखील सुनावले होते. दरम्यान, राजन पाटील यांच्यानंतर आता मोहोळचे माजी आमदार रमेश कदम देखील शरद पवारांना भेटण्यासाठी अकलूज येथे पोहोचले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, मी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढावी. त्यामुळे मी शरद पवार साहेबांना मोहोळमधून उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मिळाल्यास मी मोहोळमधून तुतारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असे रमेश कदम यांनी स्पष्ट केले आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना विरोध करणारे आप्पासाहेब जगदाळे, दशरथ दादा माने आणि इतर मंडळी देखील शिवरत्न बंगल्यावर पोहोचले आहेत. 2019 साली हर्षवर्धन पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटलांसमोर दिलेला शब्द पाळावा हीच आमची मागणी असून आमचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांना शरद पवार गटात यायचं असेल तर त्यांचे स्वागत आहे. मात्र त्यांनी अधिक काम करावे आणि नंतर उमेदवारीवर दावा करावा, असे मत आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केले आहे.